बहुजननामा ऑनलाइन टीम – एका व्यक्तीने कथितपणे त्याच्या प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील(crushed by a loading container) लखीपमुर खीरीमध्ये समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तरुण आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, सरजीत कुमार नामक व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी सुनसी गावाच्या हद्दीत सापडला. तो ६ जानेवारीपासून बेपत्ता होता. गावातील नागिरकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर स्पष्ट झालं की, त्याची हत्या गळा दाबून करण्यात आली आहे.
कसा झाला खुलासा?
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, ‘पोलिसांना तपास करताना सरजीतचे एका विधवा महिलेसोबत संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सरजीतच्या मोबाईल सर्विलांसच्या आधारे महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा महिलेने सांगितले की, तिचे सरजीत आणि हरपालसोबत संबंध होते. दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीच्या निधनानंतर ती दोघांवर अवलंबून होती. पण, दोघांना याची खबरबात नव्हती.’
हरपालने दोघांना आक्षेपार्ह स्थितीत बघितलं
दरम्यान, बुधवारी हरपाल अचानक घरी आला आणि त्याने महिलेला व सरजीतला आक्षेपार्ह अवस्थेत पहिले. त्याचाच राग मनात धरुन हरपालाने सरजीतचा गळा दाबून हत्या केली. महिलेने पोलिसांसमोर मान्य करत सांगितले की, तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हरपालाची मदत केली होती.