बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेलसारखे शक्तीशाली राफेल फायटर जेट सामिल झाले आहे. त्यानंतर आता 114 मीडियम फायटर जेट्स खरेदी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातच अमेरिकीच्या जो बायडेन प्रशासनाकडून एअरक्राफ्ट बनवणाऱ्या बोईंगला भारतात फाइटर जेट एफ-15EX च्या विक्रीला मंजुरी मिळाली आहे. या शर्तीमध्ये सध्या 7 फायटर जेट्स कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे एफ-15EX भारताच्या ताफ्यात सामिल झाल्यास आपली ताकद दुपटीने वाढणार आहे.
एफ-15EX एक शक्तीशाली जेट असून फ्रान्सने भारताला दिलेल्या राफेल जेटला पर्यायी ठरु शकते. असे असले तरी भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार बोईंगकडून फायटर जेटसंबंधी माहिती मिळायची असून त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल. भारताने फायटर जेट खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. जगातील सात कंपन्यांनी यात रस दाखवला असून हा करार 20 ते 30 अब्ज डॉलरचा असण्याची शक्यता आहे. बोईंगसोबत लॉकहीड मार्टिनचे सिंगल सीटर एफ-21, साब कंपनीचे सिंगल इंजीनचे ग्रिपेन, ट्विन इंजीनचे राफेल, यूरोफाइटरचे ट्विन इंजीनचे टायफून आणि रशियाचे ट्विन इंजीनचे फाइटर जेट आरएसी मिग-35 आणि सुखोई-35 सारख्या जेट्सचा समावेश होतो.