अकोला : बहुजननामा ऑनलाइन – १३ पॉइंट रोस्टर पद्धती ही विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून, याविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनच्यावतीने जि.प. सर्किट हाऊस ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठदरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला.
विद्यार्थ्यांना घातक असलेली १३ पॉइंट रोस्टर पद्धत रद्द करुन मेडिकल व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, अन्यथा शिक्षणमंत्र्यांना अकोल्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी मेडिकल व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष अमोल समाधान शिरसाट यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
यावेळी सम्यकचे राज्य सचिव हितेश जामनिक, अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक, राजकुमार दामोदर, जिल्हा महासचिव भाग्यश्री इंगळे, सहसचिव विकेश जगताप, प्रसिद्धी प्रमुख रितेश किर्तक, प्रतुल वीरघट, धीरज पांडे, किरण डोंगरदिवे, ॲड. भूषण घनबहादूर, निरीक्षक बंटी वानखडे, महानगराध्यक्ष आकाश गवई, धीरज इंगळे, अक्षय डोंगरे, पवन गवई, मिलिंद वानखडे, अक्षय आटोटे, योगेश हिरळकर, शेखर इंगळे, प्रशिक तायडे, सुरज अहीर, लकी वानखडे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.