बहुजननामा ऑनलाइन टीम –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हे अकउंट पंतप्रधानांच्या वैयक्तिक वेबसाईट narendramodi_in ला लिंक केले होते. त्यांच्या या अकाउंटचे 25 लाख फॉलोअर्स आहेत. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकरने पंतप्रधानांकडे बिटकॉइनची मागणी केली. या हॅकरने आपली ओळख सांगितली आहे. आपले नाव जॉन विक असल्याचे त्याने सांगितले आहे.
कोण आहे जॉन विक ?
जॉन विक हा एक अमेरिकी अॅक्शन थ्रिलर मीडिया फ्रँचाइजी आहे. याची निर्मिती डेरेक कोलस्टॅडने तयार केली होती. यात कोलडस्टने लिहिलेले तीन चित्रपट अंतर्भूत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक चाड स्टेल्की यांनी केले होते. फ्रँचाइजीमध्ये कियानू रीव्सने काम केले आहे. हा चित्रपट जॉन विक नावाच्या एका निवृत्त मात्र घातक हिटमॅनच्या चरित्रावर आधारित आहे. त्याला बदला घेयचा असतो.
सीरीजचे तीन पार्ट
या सीरिजची सुरुवात 2014 मध्ये जॉन विकच्या प्रदर्शनासोबतच झाली. त्यानंतर दोन सीक्वल आहे. जॉन विक चॅप्टर 2. हा 10 फेब्रुवारी 2017 ला प्रदर्शित झाला. जॉन विक चॅप्टर 3 पॅराबेलम 17 मे 2019 ला प्रदर्शित झाला. हे तिन्ही चित्रपट दर्शकांनी डोक्यावर घेतले. या तिन चित्रपटांसोबतच या साखळीने जगभरात 580 मिलियन डॉलर्सहून अधिक कमाई केली.
कियानू रीव्सचा अभिनय
जॉन विक चित्रपट मालिकांमधे या पात्राला कियनू रीव्हने साकारले. जॉन विक याच नावाने हॉलिवूडमध्ये तयार करण्यात आलेल्या चित्रपटात कीनू रीव्सने साकारलेले एक काल्पनिक चरित्र आहे. ही कथा एका हिटमॅनची आहे. त्याच्या कुत्र्याला ज्यांनी मारलेले असते, अशांचा तो निवृत्त झाल्यावर बदला घेतो.