बहुजननामा ऑनलाइन टीम – भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय लष्कराने(The Indian Army) बांगलादेशी सैन्याला 20 प्रशिक्षित सैन्य घोडे आणि 10 स्फोटकाचा शोध घेणारे कुत्रे भेट दिली आहेत, ज्यांना भारतीय लष्कराच्या(The Indian Army) ‘रीमाउंट एंड वेटरनेरी कॉर्प्स’ने प्रशिक्षण दिले आहे. भारतीय सैन्याने त्यांना सांभाळण्यासाठी बांगलादेश लष्कराच्या जवानांना प्रशिक्षणही दिले आहे.
भेट-देण्याचा कार्यक्रम भारत-बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल-बेनापोल इंटिग्रेटेड चेक पोस्ट येथे झाला. यावेळी ढाका येथील भारतीय उच्चायोगाचे ब्रिगेडियर जेएस चीमा हेदेखील उपस्थित होते.
यावेळी भारतीय लष्कराच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मेजर जनरल नरिंदर सिंग यांनी केले होते, जे ब्रह्मास्त्र कॉर्प्सचे प्रमुख ऑफ स्टाफ आहेत. बांगलादेशी सैन्याच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व मेजर जनरल मोहम्मद हुमायून कबीर यांनी केले होते. ब्रह्मास्त्र कोर्प्सचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल नरेंद्र सिंह म्हणाले की, भारतीय सैन्यात लष्करी कुत्र्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे.
मेजर जनरल नरेंद्र सिंह म्हणाले की, ” बांगलादेशसारख्या मैत्रीपूर्ण देशाला सुरक्षेसारख्या विषयांवर मदत करण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत. सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून कुत्र्यांनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. ज्या कुत्र्यांना दिले गेले आहे ते स्फोटकाचा शोध घेण्यात अत्यंत प्रभावी आहेत. ”