बहुजननामा ऑनलाईन टीम – माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन दुचाकीची भीषण धडक झाल्याने तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सावरगाव येथील बुखारी शाळेजवळ आज दुपारी साडे तीनच्या सुमारास हि घटना घडली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही दुचाकी समोरून वेगात येत होत्या. दोघांची जोरात टक्कर झाली. या धडकेमध्ये तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. गणेश श्रीकिसन मिसाळ (वय ३० रा.देवळा (पुनरवसन) ता. सेलु जि. परभणी) असे मृत झालेल्यापैकी एकाच नाव असून दोघांची ओळख पटलेली नाही. तर शंकर जितु भोसले, अजित भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही केकत पांगरी ता. गेवराई येथील रहिवासी आहेत.
अपघात घडताच स्थानिकांनी जखमींना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होत. त्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ३ मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना अपघाताविषयी माहिती देण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.