ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – ठाणे शहर गुन्हे शाखेच्या (Thane City Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (Anti-drug squad) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठी कारवाई (Action) केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-drug squad) तिघांना अटक (Arrest) करुन त्यांच्याकडून 39 लाख रुपये किंमतीचे नेपाळी हिरव्या रंगाचे चरस जप्त (Nepali green charas seized) केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.29) डायघर पोलीस ठाण्याच्या (Diaghar Police Station) हद्दीत कल्याण-शीळ रोडवरील (Kalyan-Sheel Road) देसाई नाका (Desai Naka) जवळील रिवरवुड पार्कजवळ (Riverwood Park) रात्री बाराच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत एकूण 45 लाख 38 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
एरिक बनेथ किल्लेन Eric Baneth Killen (वय-27, रा. डोंबिवली पूर्व), सुमेध रवींद्र कसबे Sumedh Ravindra Kasbe (वय-24, रा. नवी मुंबई), प्रवीण विश्वंभर चौधरी Praveen Vishwambhar Chaudhary (वय-47, रा.डोंबिवली पूर्व) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची (accused) नावे आहेत. आरोपींवर डायघर पोलीस ठाण्यात (Diaghar police station) एन.डी.पी.एस.ॲक्ट (N.D.P.S.Act 1985) 1985 कलम 8 (क), 20 (क), 20(ब) प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायघर पोलीस स्टेशनच्या (Diaghar police station) हद्दीत कल्याण-शीळ रोडवरील (Kalyan-Sheel Road) देसाई नाका जवळ रिवरवुड पार्कजवळ, देसाईगाव येथे तीन व्यक्ती नेपाळी हिरव्या रंगाचा चरस (Nepali green charas) घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना तब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 किलो 948 ग्रॅम वजनाचा 38 लाख 96 हजार रुपेय किंमतीचा नेपाळी हिरव्या रंगाचा चरस (Nepali green charas) जप्त केला. तसेच 1 लाख 12 हजार रुपये किंमतीचा लेसरजिक अॅसिड पेपर (LSD), 10 हजार 020 रुपये किंमतीचा 334 ग्रॅम गांजा, टाटा कंपनीची (Tata Company) टियागो कार (Tiago car) , रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 45 लाख 38 हजार 020 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.
Web Titel : thane crime branch police 39 lakh nepali green hashish seized in thane 3 arrested
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update