मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप (BJP) नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ ( bjp leader Chitra Wagh) यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी वाघ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. Chitra Wagh | bjp has given another big responsibility chitra wagh letter sent chandrakant patil
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (BJP state president Chandrakant Patil) वाघ यांना पत्र (Letter) पाठवले आहे. या पत्रात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून आपण जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात. गेली अनेक वर्षे आपण सामाजिक अन् राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात. युवती आणि महिला या विषयातील आपला प्रदीर्घ अनुभव आहे. आगामी काळात भाजपच्या महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येत आहे. ती जबाबदारी तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल असा विश्वास व्यक्त करत पाटील यांनी वाघ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान चित्रा वाघ यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly elections) राष्ट्रवादी काँग्रेसचा (Nationalist Congress) राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. भाजपात आल्यानंतर वाघ यांच्यावर पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. गेल्या काही महिन्यांपासून चित्रा वाघ सातत्याने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरोधात आक्रमक पवित्रा घेत आहेत.
Web Title :- Chitra Wagh | bjp has given another big responsibility chitra wagh letter sent chandrakant patil
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत