मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – केंद्रीय निवडणूक आयोगावर (Central Election Commission) शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Thackeray Group) गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे की, तुमच्या भूमिकेमुळेच शिंदे गटाला (Shinde Group) आमची रणनिती समजली. तसेच पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकते माप दिले गेल, असे गंभीर आरोप करणारे 12 मुद्दे असलेले पत्र शिवसेनेने निवडणूक आयोगाला लिहिले आहे. थोड्या वेळापूर्वी हे तक्रार पत्र ठाकरे गटाच्या (Thackeray Group) वकिलांनी निवडणूक आयोगात सादर केले.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Thackeray Group) गंभीर आरोप करताना या पत्रात म्हटले आहे
की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याच निवडणूक आयोगाने चिन्हासंदर्भात जे निर्णय घेतले, त्या सर्व निर्णयांमध्ये उघडउघडपणे पक्षपातीपणा केला आहे. आम्ही दिलेले चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाने जाणून-बुजून दुसर्या बाजूला कळतील, अशा पद्धतीने वेबसाईटवर टाकले. तुमच्या याच भूमिकेमुळे शिंदे गटाला आमची सगळी रणनिती समजली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेनेने पत्रात म्हटले आहे की, निवडणूक आयोगानेच आमची सगळी रणनीती शिंदे गटाकडे उघड केली.
आमच्याच यादीतील चिन्ह आणि नावाचे पर्याय शिंदे गटाने कसे सादर केले? हे सर्व निवडणूक आयोगाच्या मदतीमुळेच शक्य झाले.
Web Title :- Thackeray Group | it was because of role of election commission that shinde faction knew our strategy serious allegations of thackeray group uddhav thackeray
हे देखील वाचा :
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचे पत्रातून निवडणूक आयोगावर 12 बाण