बुलढाणा : बहुजननामा ऑनलाइन – जर येत्या काळात विरोधी पक्ष विखुरलेले अवस्थेत राहिले तर त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो आणि तसं कारस्थान भाजपाकडून सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. तसचे आपण भाजपमध्ये (BJP) जाणार नाही, राष्ट्रवादीतच (NCP) राहणार असल्याचे सांगत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.
एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, एकेकाळी भाजपचे (BJP) दोन खासदार असताना भाजपला हिणवलं जायचं. त्यावेळी आम्ही मोठ्या मेहनतीने पक्ष वाढवला. बनिया, ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या भाजपला गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde), प्रमोद महाजन (Pramod Mahajan), एकनाथ खडसे यांच्यामुळे बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मी पुन्हा भाजपात जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार असेही खडसे यांनी यावेळी सांगितले आणि त्या चर्चेला पूर्णविराम दिला.
एकनाथ खडसे आणि त्यांच्या स्नुषा भाजप खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) हे अमित शहांच्या (Amit Shah) भेटीसाठी दिल्लीत गेले होते.
यानंतर एकनाथ खडसे हे आगामी काळात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात होता.
परंतु आपण भाजपमध्ये जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार असे ठाम उत्तर एकनाथ खडसेंनी दिले.
Web Title :- Eknath khadse | buldhana news i will not join bjp i will remain in ncp says eknath khadse
हे देखील वाचा :
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचे पत्रातून निवडणूक आयोगावर 12 बाण
Pune Motor Driving School | महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन
Cricket Match Fixing Case | क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी ‘या’ खेळाडूवर 14 वर्षांची बंदी
Pune Crime | महापालिका परीक्षेत इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसद्वारे कॉपी करणारा अटकेत