बहुजननामा ऑनलाइन टीम : अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. हाती आलेल्या या संधीचा फायदा घेत भाजपाचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी ट्विट केले आहे, की ‘एनएन वोहरा समितीने दिलेला अहवाल प्रसिद्ध केल्यास लगेचच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार(Thackeray government ) पडेल.’
20.3.1997 को @DinTri की PIL [WP(C) 664 / 1995] पर सुप्रीमकोर्ट ने केंद्र सरकार को वोहरा कमेटी रिपोर्ट पर कार्यवाही करने का निर्देश दिया था
23साल बीत गए लेकिन वोहरा कमेटी रिपोर्ट पर न तो कोई कार्यवाही हुई और न तो इसे सार्वजनिक किया गया@HMOIndia @AmitShah@PMOIndia @narendramodi
— Ashwini Upadhyay अश्विनी उपाध्याय (@AshwiniUpadhyay) November 7, 2020
एनएन वोहरा समितीच्या अहवालात असं म्हटलं आहे, की दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगारांशी राजकीय नेते तसेच नोकरशहांच्या असलेल्या संबंधांबाबत खळबळजनक माहिती होती. एनएन वोहरा यांच्या अध्यक्षतेखाली नरसिंहराव सरकारने १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर एका समितीची स्थापना केली होती.या अहवालातील केवळ १२ पानेच प्रसिद्ध करण्यात आली होती. या नेत्यांची माहिती कधी प्रसिद्ध केली जाईल, असा प्रश्न देखील त्यांनी आपल्या ट्विटव्दारे ठाकरे सरकारला(Thackeray government) विचारला आहे.
अश्विनी उपाध्याय (भाजप नेते) यांचे ट्विट
हा अहवाल सार्वजनिक प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. या अहवालाला आता २३ वर्षे पूर्ण होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने वोहरा समितीच्या अहवालावर कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारला दिली होती; मात्र या अहवालावर कारवाई झाली नाही.
वोहरा समितीचा अहवाल
– १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर नरसिंहराव सरकारने एनएन वोहरा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती.
– या समितीचे अध्यक्षपद तत्कालीन गृहसचिव एनएन वोहरा यांच्याकडे होते.
– समितीमध्ये रॉ आणि आयबीचे सचिव, सीबीआयचे संचालक आणि गृहमंत्रालयाच्या सचिवांचाही समावेश होता.
– अनेक नेते आणि नोकरशहांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून सरकारला देण्यात आली होती.
– अहवाल पूर्णपेणे प्रसिद्ध करण्यात आला नाही.
– फक्त १०० पानी अहलवालामधील १२ पाने प्रसिद्ध करण्यात आली होती.
– अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मोठे अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधांबाबतची माहिती आहे.