बहुजननामा ऑनलाईन – दक्षिण काश्मीरच्या पामपोर येथे दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे( CRPF) दोन जवान शहीद झाले असून अन्य तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडवून दहशतवादी परिसरातच कुठेतरी लपून बसल्याची माहिती आहे. दरम्यान दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात शोध मोहीम राबविली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरमधील पामपोरमधील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य केले आहे. पामपोरच्या कांधीजल ब्रिजवर सीआरपीएफची 110 बटालियन आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान रोड ओपनिंग ड्यूटी (आरओपी) वर तैनात असल्याची माहिती आहे. दरम्यान, तेथे काही दहशतवादी पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
https://twitter.com/ANI/
या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून तीन जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान असे वृत्त येत आहे की दहशतवादी घटना घडवून परिसरात कुठेतरी लपून बसले आहेत. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम सुरू आहे.