बहुजननामा ऑनलाइन – टीव्ही रिॲलिटी शो ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) ला ३ (radhe maa)ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. बिग बॉसच्या १४च्या सीजन मध्ये सर्वात जास्त चर्चा राधे माँ (radhe maa)यांच्या नावाची आहे. या शोसाठी राधे माँ ने बिग बॉस १४ कडून पत्येक आठवड्यासाठी ७५ लाखांची मागणी केली आहे. तर आज आपण राधे माँ यांच्या आयुष्याविषयी जाणून घेणार आहे.
राधे माँ यांचं खरं नाव सुखविंदर कौर आहे. राधे माँ चा जन्म पंजाबच्या गुरदासपूरमधील दोरांगला गावामध्ये झाला. राधे माँ आता ५५ वर्षाची झाली आहे. ती एक स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आहे. राधे माँ स्वतःला देवीचा अवतार म्हणवते. ती आपल्या भक्तांना लाल कपड्यांमध्येच भेटते. तसेच भेटताना तिच्या हातामध्ये एक छोटासा त्रिशुलसुद्धा असतो.
सुखविंदर कौरचं म्हणजेच राधे माँ शिक्षण ९वी पर्यंतच झालं आहे. तिने वयाच्या १७ च्या वर्षी मुकेरी मनमोहन सिंगसोबत लग्न केलं होतं. तो मिठाईच्या दुकानात काम करायचा. लग्नानंतर राधे माँ चा पती कतार मध्ये नोकरीला गेला. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती त्यामुळे राधे माँ लोकांचे कपडे शिवून आपला उदरनिर्वाह करायची. मिळालेल्या माहितीनुसार वयाच्या 21 व्या वर्षी सुखविंदर कौर महंत श्री रामदिन दास यांच्या आश्रयाला पोहोचली. श्री रामदिन दास यांनी सुखविंदरला सहा महिन्यांसाठी दीक्षा दिली.अध्यात्माची दीक्षा घेतल्यानंतर रामदिन दास यांनी सुखविंदरला नवीन नाव दिले आणि मग पुढे सुखविंदर राधे माँ म्हणून ओळखली जाऊ लागली.
राधे माँ सध्या मुंबईत राहते. राधे माँच्या घरी दर आठवड्याला माता की चौकी, सत्संग आणि जागरण आयोजित केलं जातं. यामध्ये हजारो भक्त येतात. राधे माँच्या भक्तांमध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीचा समावेश सुद्धा आहे. यामध्ये रवि किशन, मनोज बाजपेयी, डॉली बिंद्रा आणि गजेंद्र चौहान यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. राधे माँ कोणत्या न कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. राधे माँ बिग बॉस मध्ये आल्या तर त्या एक खास आकर्षण असणार आहे.