नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणामधील कॉंग्रेस नेते गुडूर नारायण रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपचे अन्य बडे नेतेही त्यांच्यासमवेत दिसले. यापूर्वी गुडूर नारायण यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला.
यासह गुडूर नारायण यांनी तेलंगणा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कोशाध्यक्ष म्हणूनही राजीनामा दिला होता. ते जवळजवळ चार दशके कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या राजीनाम्यामध्ये ते म्हणाले की, 1981 पासून ते कॉंग्रेसशी संबंधित होते आणि विद्यार्थी जीवन काळात त्यांनी पक्षाची सेवा केली. याबद्दल कॉंग्रेस नेत्यांचे आभार.
Gudur Narayan Reddy joined Bharatiya Janata Party (BJP) in Delhi, earlier today. He later met party president JP Nadda. https://t.co/gBsUhjwSsc pic.twitter.com/i8IGIBtSKT
— ANI (@ANI) December 7, 2020
गुडूर नारायण यांनी आपल्या पत्राद्वारे म्हटले आहे की, आता ते तेलंगणा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कोशाध्यक्ष, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य पद आणि पक्षाची प्राथमिक सदस्यता या पदांचा राजीनामा देत आहे. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसने केवळ दोन प्रभागांवर विजय मिळविला, त्यावेळी भाजपने त्यात चांगली कामगिरी केली.
हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर निर्णय
तेलंगणाच्या सत्ताधारी टीआरएसने 150 प्रभागातील ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत 55 जागा जिंकल्या आहेत, तर भाजप हा दुसरा पक्ष म्हणून उदयास आला आणि त्याने 48 प्रभाग जिंकले. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला 150 जागांवरील 149 जागांवर मतदान झाले. शुक्रवारी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत टीआरएसने 55, भाजपने 48, एआयएमआयएम 44 आणि कॉंग्रेसने दोन जागा जिंकल्या आहेत.