पोलीसनामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 14 ( Bigg Boss 14 ) मध्ये 6 नवीन चॅलेंजर्सची एंट्री झाली आहे. रविवारी शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) यानं या 6 चॅलेंजर्सला इंट्रोड्युस केलं आहे. यात राखी सावंत, विकास गुप्ता, राहुल महाजन, कश्मिरा शाह, अर्शी खान आणि मनू पंजाबी यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टमध्ये आणखी एक चकित करणारा खुलासा केला जात आहे. हा खुलासा फिनालेबद्दल आहे. अलीकडेच सलमान खानच्या फिनालेच्या ( Bigg Boss 14 ) घोषणेमुळे स्पर्धक हैराण झाले होते.
गेल्या आठवड्यात सलमान खाननं घोषणा केली होती की, 1 आठवड्यात शोचा फिनाले होणार आहे. घरात 4 सदस्यच असतील. या घोषणेनंतर स्पर्धकच नाही तर चाहतेही चकित झाले होते. परंतु आता घरात 6 स्पर्धकांची एंट्री झाली आहे. यानंतर आता सर्वांना हा प्रश्न पडला आहे की, फिनाले कधी आहे. एका रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, मेकर्सनं आता हा सीजन दीड महिन्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा शो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच संपणार होता; परंतु आता हो शो फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. असं सांगितलं जात आहे की, 21 फेब्रुवारी रोजी बिग बॉस 14 चा फिनाले होणार आहे. परंतु अद्याप याची घोषणा झालेली नाही.