बहुजननामा ऑनलाइन टीम – देशातील लोकांमध्ये एसयूव्ही कल्चर लोकप्रिय करण्यात टाटा मोटर्सच्या ‘टाटा सफारी’ ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नवीन वर्षात कंपनीने हा आयकॉनिक ब्रँड पुन्हा बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.
‘ग्रॅविटास’ बनणार ‘सफारी’
टाटा मोटर्स आपली नवीन एसयूव्ही ‘सफारी’ ब्रँडच्या अंतर्गत बाजारात उतरविणार आहे. कंपनीने म्हटले की, त्याचे कोडनेम ‘ग्रॅविटास’ आहे. ग्रॅविटासला कंपनीने 2020 च्या ऑटो एक्सपोमध्ये सादर केले होते. कंपनीच्या पॅसेंजर व्हेहिकलचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी अधिकृत निवेदनात म्हंटले कि, “कंपनी आपली फ्लॅगशिप एसयूव्ही, सफारी पुन्हा सादर करीत आहे. दरम्यन, नव्या टाटा सफारीचे बुकिंग अधिकृतपणे कधी सुरू होईल, याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिली नाही. पण ही टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये जानेवारीपासून उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत जानेवारीपासून त्याचे बुकिंगही सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
काय आहे खास ?
कंपनीच्या निवेदनानुसार नवीन टाटा सफारीमध्ये स्ट्रॉंग स्टान्स, जबरदस्त परफॉर्मन्स, ड्रायव्हिंगची सहजता, लक्झरी इंटिरियर्सची काळजी घेतली आहे. ही सफारी ओमेगा आर्किटेक्चर ( ओमेगार्क) वर आधारित आहे. ओमेगार्क लँड रोव्हरच्या डी 8 प्लॅटफॉर्मवरून काढलेला एक आर्किटेक्चर आहे. हे सूचित करते की, नवीन सफारीमध्ये ग्राहकांना 4×4 म्हणजेच ऑल-व्हील ड्राइव्हचा पर्याय मिळू शकेल. कंपनीने भविष्यात विद्युतीकरणाच्या शक्यताही प्रकट केल्या आहेत.
शैलेश चंद्रा म्हणाले, “सफारी हा एक आयकॉनिक ब्रांड आहे, ज्याची मोठी फॉलोविंग असून दोन दशकांहून अधिक काळ भारतीय रस्त्यांवर सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही आहे. त्याच्या नवीन अवतारात हे अद्वितीय अनुभव आणि साहस शोधत असलेल्या ग्राहकांना आकर्षित करेल. त्याचे डिझाइन, परफॉर्मन्स, विविधता, फीचर्स आणि दीर्घकाळ टिकणारी बिल्ड क्वालिटी यामुळे लोकांमध्ये कल्ट स्टेटस बनवेल. “