नवी दिल्ली :वृत्तसंस्था – TATA Motors Electric Car | टाटा मोटर्स आपली बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार टिगोरचे इलेक्ट्रिक व्हर्जन टाटा टिगोर ईव्ही लवरकच लाँच करणार आहे. परंतु त्यापूर्वीच कंपनीने या कारचे (TATA Motors Electric Car) बुकिंग सुरू केले आहे.
किंमत 5.65 लाख रुपये ते 7.82 लाख
टाटा मोटर्स या कारच्या किंमतीची घोषणा 31 ऑगस्टला करणार आहे. परंतु जाणकारांनुसार, कंपनी ही कार 5.65 लाख रुपये ते 7.82 लाख रुपयाच्या प्रारंभिक किंमतीसह लाँच करू शकते.
बुकिंगसाठी 21 हजार टोकन अमाऊंट
ही कार बुक करण्यासाठी जवळच्या टाटा डीलरशिप किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकतो. बुकिंगसाठी 21 हजार रुपयांचे टोकन अमाऊंट द्यावे लागेल.
डिझाईनमध्ये सुद्धा बदल
मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने या कारमध्ये काही वेगळे नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिले आहेत. यासोबतच कंपनीने या कारच्या डिझाईनमध्ये सुद्धा खुप बदल केला आहे, जो कारच्या फ्रंटवर स्पष्ट दिसू शकतो.
नवी टिगोर ईव्हीमध्ये फ्रंट ग्रिलऐवजी ग्लॉसी पॅनल, नवीन डिझाईनचा एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट,
नवीन बंपर, फॉग लॅम्प, एलईडी डीआरएल दिला जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एक्स-प्रेस-टी ईव्ही नाव
टाटा मोटर्सने या कारच्या अपडेट व्हर्जनचा खुलासा खुप अगोदर केला होता. ज्यामध्ये या टिगोर
ईव्हीचे नाव बदलून कंपनीने एक्स-प्रेस-टी ईवी केल आहे. या कारला कंपनीने पर्सनल मोबिलिटी
सेगमेंटमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
लेटेस्ट जिपट्रोन पावरट्रेन तंत्रज्ञान, लिथियम आयर्न बॅटरी पॅक, 55 kW पावर इलेक्ट्रिक मोटर, 170
एनएम टॉर्क क्षमता, 7.0 इंचची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅप्पल कार-प्ले आणि अँड्रॉईड ऑटो
कनेक्ट, मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील, हरमनची ऑडियो साऊंड सिस्टम, फ्रंट सीट ड्यूल एअरबॅग,
अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, कॅमेरासह रियर पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमायंडर, स्पीड अलर्ट.
web title: tata motors electric car tigor ev gives range of 2013 km on single charge company reveal price on august.
Parambir Singh | सचिन वाझेच्या ‘कोड’चा हॉटेल मालकाने केला उलगडा; ‘नंबर वन’ म्हणजे परमबीर सिंग