बहुजननामा ऑनलाइन टीम – दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रानं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. पंजाबी सिंगर आणि अभिनेत्यांनीही याला पाठींबा दिला आहे. हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अॅक्ट्रेस रिहाना (Rihanna) हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. यानंतर इंटरनॅशनल सेलेब्सही या आंदोलनावर मत व्यक्त करताना दिसले. रिहानानंतर ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg), एक्स अॅडल्ट स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) यांनी देखील शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केलं. काही बॉलिवूड सेलेब्सही याला पाठींबा देत आहे तर काही विरोध करत आहेत. बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) ही सुरुवातीपासूनच याला विरोध करत आहे. आजवर तिनं यावर अनेक ट्विट केले आहेत. बॉलिवूड अॅक्ट्रेस तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिनं आता कंगनावर निशाणा साधला आहे.
तापसी पन्नूनं काही वेळापूर्वीच एक ट्विट केलं. यात तिनं कोणाचंही नाव लिहिलेलं नाही. परंतु ट्विट पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की, ते कंगनासाठी आहे. अनेकांनी तसं म्हटलंही आहे. आपल्या ट्विटमध्ये तापसी म्हणते, जर एक ट्विट तुमची एकता तोडत असेल, एक गंमत तुमच्या विश्वासाला चिरत असेल तर, किंवा जर एक शो तुमच्या धार्मिक विश्वासाला चिरत असेल तर तुम्हाला विश्वासाची सिस्टीम मजबूत करण्याची गरज आहे. दुसऱ्यांसाठी प्रोपेंगेंड टीजर बनू नकोस.
If one tweet rattles your unity, one joke rattles your faith or one show rattles your religious belief then it’s you who has to work on strengthening your value system not become ‘propaganda teacher’ for others.
— taapsee pannu (@taapsee) February 4, 2021
तापसीचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या ट्विटची खूप चर्चा सुरू आहे.
तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती थप्पड सिनेमात दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठ्ठू मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा क्रिकेटर मिताली राजचं बायोपिक आहे. याशिवाय हसीन दिलरूबा हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर असे कलाकार दिसणार आहेत. लूप लपेटा, रश्मी रॅकेट हे सिनेमेही तिच्याकडे आहेत. रश्मीचा रॅकेटचा फर्स्ट लुकही समोर आला आहे. इतकंच नाही तर तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती सोबतही ती एका तमिळ सिनमात काम करणार आहे.