सातारा : बहुजननामा ऑनलाईन – सातारा जिल्हा संत रोहिदास चर्मकार संस्थेच्या वतीने संत रोहिदास यांची ६२१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या सर्व जवानांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संत रोहिदास महाराज यांची आरती करण्यात आली. यावेळी दुचाकी रॅलीचे आयोजन नितीन चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन अशोक गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी नितीन चव्हाण, अमित शिंदे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. रमाकांत साठे, सोमनाथ काळे, अमोल बनसोडे, चव्हाण, रामदास शिखरे, निलेश बळी, सुनीता चव्हाण, डॉ. विधाते, सौ. पटनी, डॉ. उमेश पाटील, प्रियांका चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०१९ चा संत रोहिदास पुरस्कार कारी (ता. सातारा) येथील डॉ. राजेंद्र गणपत जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास सोमनाथ काळे, संजय सावंत, सत्यवान बागडे, सुनीता चव्हाण, प्रियांका शिंदे, ताराबाई शिंदे, विलास कांबळे, अनिल चव्हाण, राजू गडकरी, संजय गडकरी, प्रकाश शिंदे, सुहास कांबळे, रामदास शिखरे, तानाजी शिंदे आदी उपस्थित होते.