बहुजननामा ऑनलाईन – सध्या जम्मू- काश्मीर मध्ये कलम ३७० रद्द केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच अंतर्गत आता स्थानिक पक्ष असणाऱ्या ‘हुर्रियत’चे प्रमुख नेते सय्यद अली गिलानी यांना लाखो रुपये मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीर येथीलच एका फुटीरतावादी नेत्याच्या चौकशीदरम्यान हा गौप्यस्फोट केला. सय्यद अली गिलानी यांना सहा ते आठ लाख रुपये गुप्तपणे निधी पुरवली जायची. गिलानी यांनी या निधीचे सर्व पुरावेही नष्ट केल्याचे सांगण्यात आले.
रमजानच्या महिन्यात तहरिक-ए – हुर्रियत आपल्या वृत्तपत्रात देणगीसाठी जाहिराती देत असतात. अनेक व्यापारी आणि पदाधिकारी हे या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाला देणगी देत असतात. यामधील ६० टक्के निधी जिल्हाध्यक्षांकडे जाते तर उर्वरित ४० टक्के निधी गिलानी यांना मिळायचे. अशी माहितीही या नेत्यांनी दिली आहे.
सहा ते आठ लाख देणग्या अनेक गुप्त व्यक्तींकडून येतात. बहुतांश लोकांना याबाबदल काहीच माहिती नाही. मात्र, यामध्ये जहूर वटाली या काश्मीर व्यापाऱ्यांचा यात मोठा वाटा असल्याचेही या संबंधित फुटीरतावादी नेत्याने सांगितले आहे. वटाली आणि जम्मू-काश्मीर बँकेविरोधात या माहितीच्याआधारेच लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे. तसेच वटाली यांच्यासह अनेक फुटीरतावादी नेत्यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. मात्र, यानंतर सर्वोच्च न्ययालयाने वटालीला जामीन मंजूर केला आहे.