नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय स्वर्णकार समाजाच्या नागपूर मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र येरपुडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष शशिकला सोनी यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. महिला कार्यकारिणीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माया हाडे व मधू दरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून रितू जरगर, अनुराधा रेभे, देवयानी कुर्वे, हेमाबेन कडेल, सुरेखा लोळगे, किरण श्रीरामपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रधान महासचिव म्हणून किरण सोनी तर महामंत्री म्हणून पुष्पा रधुनंदनचिले व सुधा सोनी यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय विधी सल्लागार म्हणून आभा सोनी, प्रणीता करुले यांची तर सचिवपदी निर्मला सोनी, संगीता बागूल, सुनील सराफ, वर्षा सोनी यांची निवड झाली आहे.
संघटन मंत्री म्हणून किरण सराफ, अनिता पाली, छाया सोनी, संजू सोनी, कंचन सोनी, किरण सोनी, बबिता सोनी, भारती बुंदीलाल यांची तर सहसचिव म्हणून संध्या दरे, श्यामा सोनी, प्रीती सोनी, सरोज सोनी, लक्ष्मी सोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रचारमंत्री म्हणून नंदिनी चौधरी, मंदाकिनी सोनी, मंजू सोनी, सविता सोनी, सरोज सोनी, मिनी सोनी यांची निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदी मीना दरे व डॉ. सीमा सोनी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत हरियाणा प्रदेशाध्यक्ष म्हणून ममता वर्मा, उत्तरप्रदेश अध्यक्ष म्हणून सुदेश कुमारी, उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष म्हणून श्वेता वर्मा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून शालिनी काटोले यांचा समावेश करण्यात आला आहे.