नवी दिल्ली वृत्तसंस्था : आपल्या काही ट्विटमुळे कलाकार नेहमीच गोत्यात येत असतात. अश्याच एका ट्विटमुळे बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा यूजर्सच्या टीकेला बळी पडली आहे. स्वरा भास्कर चे हे ट्विट मध्ये जम्मू – काश्मीर आणि तिथल्या ईद संदर्भात आहे. तिने आपल्या ट्विट मध्ये काश्मीर मधील परिस्थितीवर दिल्लीमध्ये होणाऱ्या प्रोटेस्ट चे समर्थन केले आहे. परंतू तिचे हे ट्विट काही यूजर्सना न आवडल्याने लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. स्वरा ने आपल्या ट्विट मध्ये लिहिले कि, ” या सणाच्या वेळी कोणालाही एकटे वाटण्याची गरज नाही. दिल्लीवाल्यांनो या काश्मिरी विद्यार्थ्यांच्या प्रति जरा प्रेम व्यक्त करा. थोडं जेवण घेऊन या आणि सहभागी व्हा. ”
तसेच तिने आपल्या ट्विट मध्ये सगळ्यांना दिल्लीच्या जंतर-मंतर येथे दुपारी १.३० पर्यंत प्रोटेस्ट करण्याची विनवणी केली आहे. स्वरा ने ट्विट सोबत प्रोटेस्ट संदर्भात माहिती देणार पोस्टर देखील अपलोड केले आहे , ज्यात काश्मीर चा नकाशा काळ्या रंगात दाखवला आहे. त्यासोबतच तिने लिहिले आहे कि, “ईद घरापासून दूर. काश्मीर मध्ये सेवा बंद आहेत , तर चला आमच्या सोबत साजरी करा. जम्मू काश्मीर च्या लोकांकडून आयोजन केले आहे. आपला जेवणाचा डब्बा सोबत घेऊन या. ”
तिच्या या ट्विट मुले ती चांगलीच ट्रोल झाली आहे. एका यूजर्स ने कंमेंट्स मध्ये लिहिले कि, ‘ बीबीसी वाल्यानी काय सांगितले ? ‘ दुसऱ्या यूजर्स ने लिहिले कि, “हे तेच विद्यार्थी आहेत का जे , दोन वर्ष आधी क्रिकेट मॅच मध्ये पाकिस्तान कडून भारताचा झालेला पराभव साजरी करत होते, ? तर त्यांना लाथ मारा , देशद्रोह्यांना लाथच मारायला हवी , जर ते खरेच भारतीय आहेत तर त्यांना तेवढेच मिळेल जेवढी आमची क्षमता आहे , ” तर एका यूजर्स ने स्वरा ने पोस्ट केलेल्या काश्मीर च्या काळया नकाशाला विरोध करत लिहिले कि , “जे करायचंय ते करा , पण काश्मीर ला अंधारात नका दाखवू , आता कुठे तिथे सकाळ झाली आहे , तिरंगा फडकला आहे, ”
अनेक यूजर्स ने स्वराने दाखवलेल्या काळ्या काश्मीरच्या पोस्ट ला आपत्तीजनक असल्याचे सांगितले आहे, अजून एका यूजर्स ने लिहिले कि , ” आम्ही जेवण आणू शकतो , सात्विक जेवण , जेणेकरून ते ईद साजरी करू शकतील , पण तुम्ही आमच्या भारताच्या भागास काळ्या रंगाने का दाखवलं ?, तुम्हाला आनंद नाही झाला का ? कि तिथे भारताचा तिरंगा फडकणार आहे म्हणून , ” अश्याच काही पोस्ट द्वारे स्वरावर टीकांचा भडीमार झाला आहे.