मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारत सरकारने जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात पाकिस्तानची प्रत्येक रणनीती अपयशी ठरत आहे. पाकिस्तानने अनेक देशांना मदतीचे आवाहन केले मात्र कोणीही मदत करायला तयार झाले नाही शेवटी पाकिस्तानने चीनकडून मदत घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे चीन दौऱ्यावरती गेले. मात्र, त्यांच्या चीन दौर्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याला ट्रोल केले जात आहे.
नेमकं काय आहे त्या व्हिडीओमध्ये –
पाकिस्तानचे मंत्री कुरेशी हे चीनमध्ये जाऊन तेथील एका हॉटेल स्टाफला भेटल्याचा हा व्हिडीओ आहे, दोन देशांमधील ऐन गरमागरमीच्या वातावरणात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या या व्हिडीओमुळे पाकिस्तानातून अनेक जणांनी त्यांना ट्रॉल केले आहे. तर अनेक नेटकाऱ्यानी याची चांगलीच थट्टा उडवली आहे. त्यामुळे भारताविरोधात मदत मागायला गेलेल्या पाकिस्तानच्या मंत्र्यांचा प्लॅन पुन्हा एकदा अयशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.