अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – संत भगवानबाबा सप्ताहात आरोग्य शिबिराचे आयोजन करून महिलांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा महिलांना चांगला फायदा होईल. धार्मिक कार्यातही सामाजिक उपक्रम राबवून प्रतिष्ठान एक चांगला पायंडा पाडत आहे, असे प्रतिपादन नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी केले.
सारसनगर येथील भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवानिमित्त सेवाभावी प्रतिष्ठान व सरस्वती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी डॉ. अमोल जाधव, डॉ. प्राजक्ता जाधव, झुंबर आव्हाड, म्हातारदेव घुले, दत्ता जाधव, ह.भ.प. प्रभाताई भोंग, ह.भ.प. अमोल महाराज जाधव, पाराजी ढाकणे, रामदास बडे, देवराम घुले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन घुले, उपाध्यक्ष अनिल पालवे, ह.भ.प. सुधाकर चेमटे, शोभा ससाणे, अनिता पवार, मंगल शेळके, आशालता कुल्लाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हातारदेव घुले यांनी केले. पाराजी ढाकणे यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील महिलांनी आरोग्य तपासणीसाठी मोठी गर्दी केली होती.