अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – अखिल गुरव समाज संघटना व अ.नगर जिल्हा गुरव समाज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नगर जिल्ह्यात प्रथमच रविवार, दि. २७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता व्रतबंधन (मुंजी) सोहळा, तसेच गुरव समाजबांधवांचा मेळावा आणि वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम शहरातील लक्ष्मी कारंजा येथील गांधी मैदानाच्या आवारात संपन्न होत असल्याची माहिती अखिल गुरव समाज संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा तोरडमल यांनी केले आहे.
या मेळाव्यास अखिल गुरव समाज संघटनेेचे अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, आ. विजय औटी, आ. शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, डॉ. सुजय विखे पा., उद्योजक नरेंद्र फिरोदिया, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आमदार अनिल राठोड, दत्तात्रय मसुरकर, रंगनाथ गुरव, बंडूशेठ खंडागळे, नवल शेवाळे, सुधीर लांडगे, सुरेश कौदरे आदी. उपस्थित राहणार आहेत. व्रतबंधननानिमित्त धार्मिक विधी व त्यासाठी लागणारे साहित्य संघटनेच्यावतीने देण्यात येणार आहे.
यानिमित्त सर्व बटुंची मिरवणूक काढण्यात येणार आहे. आलेल्यांसाठी चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल तोरमडल, महिला जिल्हाध्यक्ष स्मिता शेलार, महेश शिर्के, नरेश भालेराव, पंकज काळे, शिवाजी शेलार, प्रशांत शेलार, डॉ. सुरेश थोरात, सुधाकर शिंदे, अरविंद आचार्य, उमेश शिर्के आदी प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने अखिल गुरव समाज संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा तोरडमल यांनी केले आहे..