नवी दिल्ली वृत्तसंस्था – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने काल रात्री निधन झाले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रात्री एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने राजकिय वर्तुळातील अनेक दिग्गजांसह बॉलीवूडमधील अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलीब्रेटीजने दु:ख व्यक्त केले आहे.
अमिताभ बच्चन यानी ट्वीट करून दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ही अत्यंत दुखद बातमी आहे. एक मनमिळावू व्यक्तीमत्व, अद्भूत प्रवक्ता. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी.
एक अत्यंत दुखद समाचार ! एक बहुत ही प्रबल राजनीतिज्ञ , एक मिलनसार व्यक्तिव , एक अद्भुत प्रवक्ता । आत्मा की शांति के लिए , प्रार्थना 🙏 https://t.co/TRikqtswd9
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 6, 2019
श्रधांजलि 🙏 https://t.co/Y34Ln4TAey
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 7, 2019
गान कोकीळा लता मंगेशकर यांनीही त्यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट केले आहे. त्या म्हटले आहे की, सुषमा स्वराज यांच्या अचानक जाण्याने मला धक्का बसला आहे. त्या एक प्रभावशाली आणि इमानदार नेत्या होत्या. संवेदनशील आणि निस्वार्थी व्यक्ती होत्या. त्यांना संगीत आणि कवितेची समज होती. आमच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांची नेहमी आठवण येईल.
Deeply shocked and saddened to hear about Sushma Swaraj ji’s sudden demise.
A graceful and honest leader, a sensitive and selfless soul, a keen understanding of music and poetry and a dear friend. Our former external minister will be remembered fondly.— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 6, 2019
रितेश देशमुखनेदेखील ट्वीट केले आहे. तो म्हणाला, भारतासाठी एक मोठं नुसकान- एक उत्कृष्ट संचालक, एक देशभक्त नेत्या सुषमा स्वराज आता आपल्यात नाहीत. विदेश मंत्री असताना त्यांनी नेहमी मदतीची गरज असलेल्या प्रत्येक भातीयासाठी उपलब्ध असत. त्यांचे कुटुंब, नातेवाईक, आणि लाखो चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत.
A huge loss for India- An outstanding orator, an absolute patriot, a tall leader @SushmaSwaraj Ji is no more. As an Ext Affairs minister she was always accessible to every Indian who was in need of help. My deepest condolences to the family, loved ones & millions of followers https://t.co/FuHNbQMOGX
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 6, 2019
अनुष्का शर्माने म्हटले आहे की, सुषमा स्वराज यांच्या अकस्मिक निधनाची बातमी ऐकून दुख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
तर नुकताच भाजपकडून खासदार झालेल्या सनी देओलनेही ट्वीट करून त्या आपल्या देशाच्या उत्तम नेत्यांपैकी एक होत्या. त्या विशेष होत्या. त्यांची नेहमी आठवण येईल. कुटुंब आणि मित्रांसाठी माझी प्रार्थना.
My sincere condolences on passing away of #Sushmaswaraj ji. One of the finest leader of our country.She was special and we will miss her.Sending my prayers to family and friends. pic.twitter.com/BeYy6S9TmN
— Sunny Deol (@iamsunnydeol) August 6, 2019
शबाना आझमी यांनी लिहिले आहे, सुषमा स्वराज यांचे निधन झाले हे ऐकून खुप दु:ख झाले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून आमचे सौदार्हपूर्ण संबंध होते. मी त्यांच्या नवरत्नांपैकी एक होती. माहिती व प्रसारण मंत्री झाल्यानंतर त्यांनी मला बोलवले होते. तर चित्रपटाला उद्योगाला दर्जा दिला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
Deeply saddened that Sushma Swaraj has passed away.Inspite of political differences we had an extremely cordial relationship. I was 1 of her Navratans as she called us during her I and B ministership and she gave industry status to film. Articulate sharp and accessible. RIP
— Azmi Shabana (@AzmiShabana) August 6, 2019
स्वरा भास्कर म्हणाली, त्यांची लोकशाहीच्या मानदंडांप्रती असलेली प्रतिबद्धता, एक शानदार खासदार, एक चांगल्या द्वीभाषी संचालक, एक मानवीय विदेश मंत्री, प्रेरणादायक, त्यांच्याशी विचारधारेबाबत मतभेद होते. परंतु त्यांचे संकल्प आणि कार्यपद्धतीची मी प्रशंसक आहे.
RIP #SushmaSwaraj ji. She epitomised dignity, commitment to democratic norms, grace in politics. A brilliant parliamentarian, a fine bilingual orator, a humane foreign minister- she was inspiring. I differed with her ideology, but greatly admired her resolve & work ethic. 🙏🏿🙏🏿
— Swara Bhasker (@ReallySwara) August 6, 2019
आयुष्यमान खुराणा, अर्जून कपूर यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
#SushmaSwaraj ji, may your soul rest in peace. 🙏🏻
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) August 6, 2019
India has lost its extraordinary leader, minister and personality.. May God bless her soul 🙏 #SushmaSwaraj
— arjunk26 (@arjunk26) August 6, 2019