बहुजननामा ऑनलाइन टीम – सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतरही कुटुंब, चाहते आणि जवळचे मित्र अजूनही दुःखात आहेत. विशेषत: सुशांतच्या मृत्यूवर अद्याप त्याच्या कुटुंबाचा विश्वास बसत नाहीये. आपल्या मामाची आठवण काढत सुशांतची भाची कात्यायनी आर्या राजपूतने त्याच्या नावावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये कात्यायनीने तिचे गुलशन मामा सुशांतची खूप आठवण काढली आहे. तिने लिहिले- ‘गुलशन मामा, मी जगापेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करते. तू पूर्वीही आणि आजही माझ्यासाठी सर्वात मौल्यवान व्यक्ती होता. मी नेहमी विचार करायचे की, भविष्यात कधीतरी आपण आकाशाकडे पाहून सत्याच्या रहस्याविषयी चर्चा करू. आयुष्याविषयीच्या तुझ्या बोलण्याने मला नेहमीच भुरळ पडायची आणि मला अधिक चांगले करण्यास प्रेरित करायचे. मी कधीही विचार केला नाही की, मला हा दिवस पाहावा लागेल, जेव्हा मी कधीही तुझा आवाज ऐकू शकणार नाही.’
‘जे लोक तुझ्याबद्दल विचार करायचे, तू माझ्यासाठी त्यांच्यापेक्षा जास्त होता. मी जो विचार करते त्यापेक्षा तू जास्त आहे, तू स्वत:साठी जे विचार करायचा, त्याहीपेक्षा तू माझ्यासाठी अधिक होतास. तू पूर्वी आणि आजही एक अशी ऊर्जा आहे, जी थांबवली जाऊ शकत नाही आणि ती ऊर्जा हे जग स्वतःमध्ये ठेवू शकत नाही.’
‘एकदा तू मला सांगितले होते की, प्रत्यक्षात आपण कधीच मरत नाही आणि मला त्या मुद्द्यावर खरंच विश्वास ठेवायचा आहे पण प्रत्येक दिवसागणिक ते कठीण होत चालले आहे. मला फक्त अशा समांतर विश्वात जायचे आहे, जेथे गोष्टी अधिक चांगल्या आहेत, चमकणारे तारे आहेत आणि आम्ही सर्व तुझ्या बौद्धिक विनोदांवर हसत राहू.’
सुशांतच्या भाचीने पुढेही तिच्या पोस्टमध्ये मामावरील आपले प्रेम व्यक्त केले आहे आणि ती त्याची किती आठवण काढत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या पोस्टच्या शेवटच्या ओळीत कात्यायनीने लिहिले – ‘तुझे रक्त माझ्या नसांमध्ये वाहत आहे आणि मी ते वाया घालवणार नाही. गुलशन मामा, मी तुझा अभिमान करेल, मी तुझ्यावर कायम प्रेम करेल गुलशन मामा.’