मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीने चौकशी सुरु केली आहे. रियावर सुशांतच्या वडिलांनी पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. यासाठी शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) रियाची ईडीने तब्बल ८ तास चौकशी केली. तेव्हा विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नावर रियाने ‘माहिती नाही’ अथवा ‘मला कस तरी होतंय’ असे उत्तर दिले आहे.
यापूर्वी रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी सतीश माने शिंदे यांनी स्थगिती मागविणारे निवेदन प्रसिद्ध केले होते आणि वाढीव कालावधीही मागितला होता. पण ईडीसमोर त्याचा फारसा फायदा झाला नाही. रिया जर ईडी कार्यालयात पोहोचली नाही तर तिच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आल्यानंतर शुक्रवारी ११ वाजून ४५ मिनिटांनी ईडी कार्यालयामध्ये ती दाखल झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने बहुतांश प्रश्नांची उत्तर देणे टाळले म्हणून तिची चौकशी जास्त वेळ चालली.
‘मला कसं तरीच होतंय’- ईडीच्या जवळपास सर्व प्रश्नांवर रियाचे एकच उत्तर
ईडी : तुम्ही किती कंपन्यांचे संचालक आहात?
रिया : सर, मला कसं तरीच होतं आहे
ईडी : तुम्ही किती कंपन्यांचे संचालक आहात?
रिया : तीन
ईडी : तुमच्या कंपन्यांचा टॅन नंबर काय ?
रिया : मी जाऊ का? मला कसं तरीच होतंय, कारण तुम्ही जे प्रश्न विचारताय त्याची उत्तरे माझ्याकडे नसून, माझ्या कंपनीच्या मॅनेजरकडे आहेत.
ईडी : आम्ही ३ कंपन्यांबाबत चौकशी करत आहोत. या तीन कंपन्या काय करायच्या म्हणजे यात कशा प्रकारची कामे केली जायची?
रिया : मला नाही माहित, माझा कंपनी मॅनेजरला विचारा.
ईडी : ज्या कंपन्यांच्या तुम्ही संचालक आहात त्याच कंपन्यामध्ये तुमचे भाऊ, आई आणि वडील हेच संचालक कसे?
रिया : आमची खाजगी कंपनी आहे. त्यामुळे संचालक पदी कोणाला ठेवायचे हा आमचा अधिकार आहे.
ईडी : पण, मग सुशांतचा पैसा या कंपन्यांमध्ये लागला होता. तर त्याच्या कुटूंबातील एकही सदस्य संचालकपदावर कसा नाही?
रिया : I DON’T KNOW मला नाही माहित, प्लिज मला कसं तरीच होतंय सर!
ईडी : सुशांतच्या खात्यातून तुमच्या खात्यात आणि तुमच्या खात्यातून तुमच्या भावाच्या खात्यात पैसे वळते झाल्याचे दिसत आहेत?
रिया : हो
ईडी : कशा करता हे पैसे घेतले होते?
रिया : आता कसं सांगणार शौविक देखील कंपनीच्या संचालक पदावर आहे, कंपनीच्या कामासाठीच पैसे घेतले असतील. मी प्रत्येक पैशांचा हिशोब नाही ठेवत त्या करता माणसे ठेवली आहेत.
ईडी : सुशांतच्या खात्यातून अनेक वेळा मोठी रक्कम रोख स्वरुपात काढण्यात आली आहे?
रिया : मला नाही माहित याबाबत काही.
ईडी : तुम्ही स्वत: कमावते आहात, तुमचा भाऊ देखील कंपनीच्या संचालकपदी आहे. मग सुशांतचे डेबिट, क्रेडिट आणि इंटरनेट बॅंकिंग तुम्ही का वापरत होता? आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार सुशांतच्या डेबिट, क्रेडिट आणि इंटरनेट बॅंकिंगचा तुम्हीच जास्त वापर करत होता आणि हे सुशांतच्या बॅंक स्टेटमेंट मध्ये पण दिसत आहे?
रिया : मी त्याची प्रेयसी आहे, आमचे नोव्हेंबर मध्ये लग्न होणार होते आणि हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे मी हे का करत होते याचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल.
ईडी : तुमच्या खाजगी टूरचा खर्च देखील सुशांतच्या खात्यातून केला गेला?
रिया : सर मी जाऊ का? कारण मला खरंच कसं तरी होतय. मी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
ईडी : तुम्ही मुंबईतील फ्लॅटस विकत घेण्यासाठी रक्कम कुठून आणली?
रिया : मी कमावलेल्या पैशातून घेतले आहेत. खारमधील फ्लॅटकरता मी ६० लाख रुपये कर्ज घेतले आहे आणि २५ लाख रुपये डाऊन पेमेंट केले आहे.
ईडी : हे फ्लॅटस् विकत घेण्यासाठी सुशांतकडून पैसे घेतले होते?
रिया : नाही
ईडी : विविडरेज रियालिटी ही कंपनी तुमच्या वडिलांच्या उलवे येथीस फ्लॅटवर रजिस्टर का केली?
रिया : मला नाही माहिती, मी जाऊ का बराच वेळ झाला आहे. मी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि तुम्ही कंपनीबाबत विचारत असेलल्या तांत्रिक प्रश्नांची उत्तरे कंपनी मॅनेजर आपल्याला देईल. कारण माझी तब्येत बरी नाही आहे. मला कसं तरी होत आहे.
मला कसं तरीच होतय असे म्हणत रिया आठ तास चौकशीला समोर गेली आहे. याप्रकरणी सोमवारी पुन्हा रिया, तिचा भाऊ शौविक, वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि सुशांतची बिजनेस मॅनेजर श्रुती मोदी यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे.