नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने आपल्याकडे सुशांत सिंह राजपूत केसशी संबंधी यावर्षाच्या जानेवारीतील एक ऑडिओ क्लिप असल्याचे म्हटले आहे. यामध्ये सुशांत, रिया आणि इंद्रजीत चक्रवर्ती व काही आर्थिक सल्लागारांसोबत बसून सुशांतच्याफायनान्शियल मॅनेजमेंटबाबत चर्चा करत आहेत. सुशांत यामध्ये ट्रस्ट बनवण्याबाबत बोलत आहे. सुशांत आपल्या भविषयाबाबत आणि बॉलीवुड सोडण्यावर चर्चा करत आहे. सोबतच सुशांत आपल्या रिटायर्डमेंट प्लॅनवर चर्चा करत आहे. 36 मिनिटांची ही क्लिप आहे.
रियाचा सुशांतच्या पैशांची एफडी करण्याचा प्लॅन
ऑडियो क्लिपमध्ये रिया म्हणत आहे की, सुशांतला पैशांची एफडी तयार केली पाहिजे. मला सर्व असं हवंय की, उदाहरण म्हणजे मी तेथे नाही, श्रुती आणि मिरांडा सुद्या नाहीत आणि कुणी अन्य नवा व्यक्ती सुशांतच्या सोबत आहे. त्याला सुशांतचे कार्ड मिळाले. पहिली गोष्ट म्हणजे मी सुशांतला सांगेन की, सर्व पैशांची एफडी कर. आपण सुशांतचे सर्व पैसे एफडीमध्ये ठेवू. सुशांतच्या कार्डमध्ये 10-15 लाखांपेक्षा जास्त नसतील. दूसरी गोष्ट जे पैसे सुशांतच्या जवळ आहेत, त्याच्यातून त्याला व्याज मिळत राहील. सुशांतची जमा ठेव सुद्धा सुरक्षित राहील. सुशांतच्या सहीशिवाय कोणतीही एफडी मोडता येणार नाही.
मुंबईतून बाहेर पडायचे होते
सुशांत ऑडियो क्लिपमध्ये बोलत आहे की, मला या शहराच्या बाहेर जायचे आहे. तर रिया बोलत आहे प्रथम आम्हाला गोव्याला जायचे आहे. एक-दोन महिने तिथे राहू. त्यानंतर निर्णय घेऊ. तो आपल्या भविष्याबाबत विचार करत आहे.
सुशांत म्हणतो रिटायर्मेंटसारख्या गोष्टींसाठी हे कसे असेल? मला मदत हवी आहे. रिया बोलते, सर्व गोष्टी पैशांसाठी आहेत. जे पैसे याच्याकडे आहेत त्याचे रिटर्न काय मिळेल. सुशांत म्हणतो की, मला एखाद्या नैसर्गिक ठिकाणी जायचे आहे. रिया म्हणते, पावना अशी जागा आहे जेथे मनाला शांती मिळेल. आम्ही एक किंवा दोन दिवस पावनाला जाऊ. आणि पाहू तिथे कसे वाटते. मला जास्त वेळ यांच्यासोबत राहायचे आहे. नंतर आम्ही या घरातून बाहेर पडण्याबाबत बोलू.
पुढे सुशांत बोलत आहे, मी क्वचितच माझ्या रूमच्या बाहेर जातो. ही सर्व माझी बौद्धिक जिज्ञासा आहे स्वताची काळजी घेण्यासाठी. परंतु आर्थिकदृष्ट्या नाही. कारण माझे मन या स्थितीत नाही. एक दिवस मला चांगले वाटते आणि दुसर्या दिवशी काही वेगळेच. म्हणून मी हा वेळ वाया घालवू शकत नाही. तर रिया बोलते, आम्ही सर्वात चांगली माणसं आहोत.
ऑडियोत सुशांत म्हणत आहे – मला केवळ माहिती द्यायची आहे. आपण हे सर्व कसे संपूव शकतो आणि पैसे वाचवू शकतो. येथे मी मनाशी लढत आहे. हीच सर्वात अवघड वेळ आहे जी मी कधीही पाहिली नाही.
इतर आवाज – वाईट काळासाठीच प्रायव्हेट ट्रस्ट बनवला जातो. जेथे व्यक्तीचे सर्व आर्थिक निर्णय ट्रस्टशी संबंधित लोकांना सोबत ठेवून देखरेख केली जाते.
पुढे रिया म्हणते – समजा आम्ही 10 रुपये या ट्रस्टमध्ये देत आहोत. त्यातून एफडी बनवायची आहे किंवा म्यूचुअल फंड खरेदी करायचे आहे. ट्रस्टी असे करू शकतात का? ट्रस्टी ठरवतील का चांगले काय असेल?
तर दुसरा आवाज येतो की, ट्रस्टीच ठरवतील. कशामध्ये चांगले रिटर्न मिळतील आणि जोखिम कमी आहे. हे सोपे सुद्धा असू शकते आणि किचकट सुद्धा. ही सर्व खराब स्थिती आहे.