बहुजननामा ऑनलाईन टीम – 14 डिसेंबरला वर्षातील शेवटचे सूर्य ग्रहण होणार आहे. ज्योतिषतज्ज्ञांनुसार, या वर्षी सूर्य ग्रहणाला एक अतिशय अशुभ योग होणार आहे. सूर्य ग्रहणादरम्यान यावेळी गुरु चांडाळ योग बनणार आहे. राहु आणि गुरु एकाच स्थानात आल्याने गुरु चांडाळ योग होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, मेष, कर्क, मिथुन, कन्या, तुळ आणि मकर राशीवर गुरु चांडाळ योगाचा सर्वात वाईट परिणाम पडू शकतो. सर्व राशिंवर या अशुभ योगाचा कसा प्रभाव राहील ते जाणून घेवूयात.
मेष
हे सूर्य ग्रहण तुमच्या राशीतून अष्टम भावाच्या राशीत घटीत होईल. ग्रहणाच्या दरम्यान गुरू चांडाळ योग तुमच्यासा एखादी मोठी आपत्ती उभी करू शकतो. विरोधक या काळात प्रबळ होतील. अनावश्यक चिंतांनी अस्वस्थ राहाल. मात्र, दुसरीकडे सामान्य लाभ होऊ शकतो आणि मनात आध्यात्मिक विचार सुद्धा येतील.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांच्या सातव्या घरात आकार घेणार्या या सूर्यग्रहणामुळे आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. सौम्य आर्थिक आव्हाने देखील असू शकतात. खर्च वाढतील, परंतु पैसे येतच राहतील. या काळात गुंतवणूक टाळा. तुम्ही गुरु चांडाळ योगाने घाबरून जाण्याची गरज नाही.
मिथुन
हे सूर्यग्रहण तुमच्या राशीतून सहाव्या घरात होईल. काही शारीरिक समस्या उद्भवू शकतात. खर्च देखील वाढतील आणि गुप्त चिंता त्रास देऊ शकतात. विरोधकांविषयी सावध रहा. मनातील गोष्टी मनातच ठेवा, इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नका.
कर्क
तुमच्या राशीपासून पाचव्या घरातील राशीमध्ये होत असलेल्या ग्रहणामुळे खर्च वाढेल. उत्पन्नामध्येही मोठी घसरण होऊ शकते. गुरु चंडाळा योगामुळे आर्थिक स्थिती कमजोर होईल. कामात व्यत्यय येईल. मुलांचीही चिंता वाटेल. प्रेमसंबंधासाठी हा काळ त्रासदायक असेल.
सिंह
तुमच्या राशीपासून चौथ्या भावातील राशीत होणार्या या ग्रहणामुळे कामात यश मिळेल. नवीन दुकान, घर किंवा नवीन व्यवसाय करण्यासाठी चांगला काळ आहे. आत्मविश्वास वाढेल आणि चांगले आर्थिक लाभही मिळतील.
कन्या
तुमच्या राशीपासून तृतीय भावात सूर्यग्रहण थोडा त्रास देऊ शकते. गुरु चांडाळ योगाने खर्च वाढू शकतात. पैस कमी होईल. जीवनात सकारात्मक बदल आणि धैर्य वाढेल. कार्यक्षेत्रातही सर्व काही ठीक होईल.
तुळ
तुळ राशीच्या लोकांच्या दुसर्या भावातील रास वृश्चिक ज्यात हे सूर्यग्रहण होईल. त्याचा प्रभाव तुमच्या राशीवर सौम्य असेल. किरकोळ आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी पैसे गुंतवणे टाळा. कोणालाही कर्ज देण्याचे टाळा.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण महत्त्वाचे ठरणार आहे कारण ते आपल्याच राशीत होत आहे. तुमच्या राशीत ग्रहण होत आहे, म्हणून तुम्हाला जास्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, या कालावधीत आपल्याला गुरु चांडाळ योगामुळे कोणतेही नुकसान होणार नाही.
धनु
तुमच्या राशीपासून द्वादश भावाच्या राशीत हे ग्रहण होत आहे. या कालावधीत होणार्या गुरु चांडाळ योगाला जास्त घाबरण्याची आवश्यकता नाही. जास्त नुकसान होणार नाही. मात्र, सूर्यग्रहणाच्या प्रभावापासून थोडे सावध रहावे.
मकर
आपल्या राशीपासून अकराव्या भावात ग्रहण होत असल्याने मध्यम परिणाम होऊ शकतात. पैशाची हानी टाळावी लागेल. गुंतवणूक किंवा कर्जाच्या व्यवहारापासून दूर रहा. या प्रकार होत असलेली कामे बिघडू शकतात. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
कुंभ
आपल्या राशीपासून दशम भावाच्या राशीत सूर्यग्रहण होत असल्याने कामात यश मिळू शकते. कार्यक्षेत्रात वर्चस्व वाढेल. परंतु एखाद्या प्रकारची शारीरिक समस्या त्रास देईल. अनावश्यक भीती वाटेल. केवळ मानसिक ताणतणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला यश मिळू शकते.
मीन
तुमच्या राशीपासून नवम भावाच्या वृश्चिक राशीतील सूर्यग्रहणामुळे मानसन्मान कमी होऊ शकतो. धन-व्यापर ठिक राहील. कौटुंबिक समस्या वाढणार नाहीत. गुरु चांडाळ योगाने कोणतीही हानी होणार नाही.