इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर येथे आयोजीत एका कार्यक्रमात बोलताना टोला लगावला. इंदापूर तालुक्यातील कौठाळी येथे विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आल्या असता या कार्यक्रमादरम्यान सभेला संबोधीत करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना एक खोचक टोला लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘फक्त सत्तेतील दिवस चांगले असतात, असे नाही. विरोधातील दिवसही चांगले असतात. मला विरोधात भाषण करायला आवडते. पण दररोज टीका करून मी थकले आता. हे रोज चुकतात म्हणून रोज टीका करावी लागते.’ असे म्हणत त्यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
यावेळी आयोजीत हळदी कुंकू कार्यक्रमाचा शुभारंभ करताना सुप्रिया सुळे यांनी विधवा महिलांच्या एका प्रश्नावर भाष्य केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आधीच या महिला खूप अडचणीतून जगत असतात. हळदी कुंकू हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. त्यांच्याबाबत एकल शब्द वापरावा पण त्यांना विधवा म्हणू नका. अशा महिला कधी कुंकू लावत नाहीत. म्हणून मी ज्या ठिकाणी जाते. त्या महिलांना कुंकू लावयला सांगते.’ असे यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, ‘सुनावणी पुढे गेली यात आश्चर्य वाटत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ईडी सरकारला यश मिळणार नाही, हे मी सातत्याने सांगते आहे. सर्वसामान्य लोकांची अडचण होते, त्यांनी जायचे कुणाकडे? कुठलं ना कुठलं कारण सांगून हे सरकार निवडणूक पुढे ढकलत आहे. यात नुकसान जनतेचे होत आहे.’ अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तसेच त्यांना यावेळी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत विचारले असता.
त्या म्हणाल्या, ‘काही कुटुंब अशी आहेत की त्यांच्यावर सारख्याच तक्रारी होतात.
त्याच्यात मला काही आश्चर्य वाटत नाही. हे सुडाचे राजकारण राज्यात थांबत नाहीये.
असे आरोप हे विरोधी पक्षावर झाले आहेत.’ असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.
दरम्यान या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne)
यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर चांगलीच टीका केली. ते म्हणाले, वरची माणसे आता खाली आली आहेत.
आमच्या सचिन सपकळच्या जागेवर काही लोक आलेत.
भाजपाचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती पुणे जिल्हा नियोजन समितीवर झाली आहे.
त्या जागेवर आमचा कार्यकर्ता होता, त्या जागेवर हे आले आहेत.
यांना फोटोमध्ये डोकवायची सवय आहे, असे म्हणत माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील
(Harshvardhan Patil) यांना चांगलाच खोचक टोला लगावला.
Web Title :-Supriya Sule | ncp mp supriya sule slam maharashtra government
हे देखील वाचा :