मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं आज (दि. 4 जून 2023) निधन झालं (Sulochana Latkar Passes Away). त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या काही महिन्यांपासून श्वसनाशी संबंधित संसर्गानं आजारी होत्या. त्यांच्यावर दादर येथील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज उपचारादरम्यान त्यानी अखेरचा श्वास घेतला.
सुलोचना लाटकर यांचा 30 जुलै 1928 रोजी जन्म झाला होता. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक भुमिका गाजवल्या. त्यांनी सुमारे 250 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भुमिका केल्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हिंदी सिनेमामध्ये त्यांनी 1950 आणि 1960 च्या दशकामध्ये आईच्या अनेक भूमिका केल्या आहेत. सुलोचना दीदींच्या जाण्याने (Sulochana Didi Passes Away) मराठी चित्रपट जगताला मोठा धक्काच बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
दरम्यान, सुलोचना दीदी हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)
त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या.
Web Title : Sulochana Latkar Passes Away | marathi hindi actress sulochana didi latkar passes away
at 94 in dadar hospital mumbai
- पुण्यात भारतातील पहिल्या अभिनव हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस सेंटरचे उद्घाटन
- कोयत्याने सपासप वार करून सूरज काळभोरचा खून, परिसरात प्रचंड खळबळ
- शाहरुखच्या मुलाची चिंता करणाऱ्या ताई पीडित मुलींची भेट घेणार का?, नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
- MP Shrikant Shinde | ‘आम्ही पातळी सोडली नाही आणि…’, संजय राऊतांच्या ‘त्या’ कृतीवर खा. श्रीकांत शिंदेंचा पलटवार
- Bajaj Finserv To Invest Rs 5k Cr In Pune | बजाज फिनसर्व्ह करणार पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक
- Ajit Pawar | विधानसभा तिकीट वाटपाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले-‘जो लोकसभा निवडणुकीत…’