Sukesh Chandrashekhar | ‘जॅकलिन-नोरा’नंतर श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी सुद्धा ठग सुकेश चंद्रशेखरच्या केसमध्ये ‘सामील’?
बहुजननामा ऑनलाईन टीम – Sukesh Chandrashekhar | सध्या ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) तुरुंगात आहे. सुकेश तुरुंगात असून देखील त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक गौप्यस्फोट समोर येत आहे. मुकेशच्या केसमध्ये जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi ) यांची नुकतीच ईडीनं चौकशी केली होती. मात्र आता या केसबद्दल आणखीन एक नवीन बाब समोर आली आहे.
सुकेशला (Sukesh Chandrashekhar) 200 कोटीच्या केसमध्ये अटक करण्यात आलं. तसेच त्यांनी ईडीच्या चौकशी वेळी अनेक लोकांची नावे समोर आणली. त्यामध्ये तब्बल 12 अभिनेत्री आणि सुपर मॉडेल्सचा समावेश आहे. जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही नंतर आता या केसमध्ये मात्र शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय. मात्र श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी यांनी आपलं सुकेश सोबत असलेल्या संपर्काबद्दल कबूल केलं आहे. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. यामध्ये श्रद्धा आणि शिल्पाच्या व्यतिरिक्त आणखीन काही अभिनेत्रींचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुकेश आणि श्रद्धा कपूर 2015 पासून ओळखतात. सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) ड्रग्ज केसमध्ये श्रद्धा कपूर काही दिवसांपूर्वी अडकली होती. त्याच केसमध्ये सुकेशनी तिला मदत केल्याची माहिती समोर आली आहे. एवढच नव्हे तर राज कुंद्राच्या (Raj Kundra ) केसमध्ये शिल्पा शेट्टीशी संपर्क केल्याचीही माहिती ईडीला दिली आहे. शिल्पाबद्दल सुकेशला विचारले असता तो म्हणाला, “शिल्पा माझी मैत्रीण आहे. मी शिल्पाला राज कुंद्राच्या केस मध्ये मदतीसाठी संपर्क केला होता.”
दरम्यान, श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसोबतच हरमन बावेजा (Harman Baweja) सुद्धा अडचणी आहे. सुकेशच्या केसमुळं जॅकलिन आणि नोरादेखील वादात अडकले आहे. त्या दोघींनी त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप त्यांचावर आहे. जॅकलीनचे त्याच्यासोबत काही पर्सनल फोटो देखील आहेत. त्या दोघांचे हे पर्सनल फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल (Jacqueline – Sukesh Viral Photo) होत आहेत.
Web Title : – Sukesh Chandrashekhar | sukesh-chandrashekhar-reveals-his-association-with-shradha-kapoor-shilpa-shetty-in-ed-chargesheet
Comments are closed.