मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लाडका बोकड (goat) विकल्याने २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केल्याचे उघडकीस आले आहे. बुधवारी सांताक्रुझ येथील शास्त्री नगर भागामध्ये ही घटना घडली. नदीम खान (Nadeem Khan) असं त्याच नाव आहे. Suicide News | mumbai 23 years old boy commits suicide upset about sale of his goat man hangs self
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नदीमची घरची परिस्थिती नाजूक होती.
त्यामुळे पैशासाठी नदीमच्या आईने काही दिवसापूर्वी त्याचा लाडका बोकड विकला.
तेव्हापासून नदीम निराश झाला होता.
बुधवारी सकाळी नदीमने नायलॉनच्या दोरीने घरामध्येच गळफास घेतला.
बराच वेळ झाला तरी नदीम दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याच्या बहिणीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
त्यावेळी त्यांना नदीम नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने छताला लटकलेल्या अवस्थेत दिसला.
शेजारच्यांनी नदीमला खाली उतरवून तातडीने जवळच्या रुग्णालयात नेहले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांनी या प्रकरणामध्ये अपघाती मृत्यूची (Accidental death) नोंद करुन घेतली आहे.
कृपया हे देखील वाचा:
रक्षकच बनला भक्षक ! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार