नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आता स्कॅमर्स आणि हॅकर्सचे नवे टार्गेट बनले आहे. हा नवा व्हॉट्सअप घोटाळा एक ओटीपी स्कॅमशी संबंधीत आहे. या नव्या स्कॅमबाबत आणखी माहिती घेवूयात आणि बचावाची पद्धत जाणून घेवूयात…
कसा आहे नवीन ओटीपी स्कॅम
नवीन स्कॅममध्ये एका ओटीपीद्वारे व्हॉट्सअप अकाऊंट हॅक केले जाते. हॅकर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून किंवा एखाद्या मित्राच्या नंबरवरून एक व्हॉट्सअप मेसेज पाठवेल. नंतर हॅकर तुम्हाला सांगेल की काही इमर्जन्सी आहे. त्याचे व्हॉट्सअप अकाऊंट लॉक झाले आहे आणि त्याच्या मोबाईलनंबरवर ओटीपी येत नाही. अशावेळी तुम्हाला वाटेल की, तो मित्र किंवा नातेवाईक अडचणीत आहे आणि आपण त्यास मदत करावी. आता तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल जो हॅकर त्याच्याशी शेयर करायला सांगेल. ओटीपी शेयर करताच तुमचे व्हॉट्सअप अकाऊंट तुमच्या डिव्हाईसवरून लॉग आऊट होईल. सोबतच अॅपवर मेसेज मिळेल की तुमच्या डिव्हाईसवरून अकाऊंट लॉग आऊट झाले आहे आणि दुसर्या कोणत्या तरी डिव्हाईसवर तुमच्या नंबरने व्हॉट्सअप वापरले जात आहे.
व्हॉट्सअप हॅक झाल्यास करा हे काम
जर हॅकरने तुम्हाला फसवले आणि त्यास तुमच्या व्हॉट्सअप अकाऊंटचा अॅक्सेस मिळाला, तर आपले व्हॉट्सअप ताबडतोब रिसेट करा. पुन्हा तसेच व्हॉट्सअपवर लॉग-इन करा, जसे पहिल्यांदा अकाऊंट बनवताना केले होते. यामुळे पुन्हा तुमच्या नंबरवर ओटीपी येईल आणि तुम्ही तुमच्या डिव्हाईसवर व्हॉट्सअपचा अॅक्सेस मिळवू शकता. यामुळे हॅकर लॉग लॉगआऊट होईल.
हे लक्षात ठेवा
* व्हॉट्सअप कधीही न मागता ओटीपी पाठवत नाही.
* न मागता आलेल्या ओटीपीकडे दुर्लक्ष करा.
* कुणी मित्र, नातेवाईक मेसेज करून ओटीपी मागत असेल तर प्रथम त्यास कॉल करा प्रत्यक्ष बोला.