बहुजननामा ऑनलाइन – व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. जेणेकरुन वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारू शकेल. यातच व्हॉट्सॲपने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या वापरकर्त्यांना ऑटोमॅटिकली मॅसेज डिलीटचा पर्याय दिला होता. ज्याद्वारे, चॅटमध्ये असलेले मॅसेज आपोआप डिलीट होतील. व्हॉट्सॲप सध्या हे फिचर 7 दिवसांच्या डेडलाईनसह ऑफर करते. जे लवकरच 24 तासांपर्यंत कमी केले जाऊ शकते. व्हॉट्सअॅप आता या सर्विसची चाचणी घेत आहे.
डब्ल्यूएबीटाइन्फोच्या मते, व्हॉट्सॲप 24 तासांनंतर डिलीट होण्यासाठी मॅसेज सेट करण्याची क्षमता तपासत आहे. परंतु हे वापरकर्त्यांसाठी केव्हा जारी केले जाईल याबद्दल माहिती नाही. दरम्यान, व्हॉट्सअॅपचे डिसॲपरिंग मॅसेज फिचर ग्रुप चॅट आणि पर्सनल कनव्हरसेशनसाठी इनेबल केले जाऊ शकते. ही सुविधा डीफॉल्टनुसार बंद आहे. परंतु आपल्याला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण ते चालू करू शकता. तर ग्रुप चॅटमध्ये केवळ ग्रुप ॲडमिन हे फिचर ऑन किंवा ऑफ करू शकते.
डिसॲपरिंग मॅसेज इनेबल करण्यासाठी
– अँड्रॉइड किंवा आयओएसवर व्हॉट्सअॅप ॲप अपडेट करा. आपण चॅट करू इच्छित असलेल्या संपर्कावर जा. नावावर टॅप करा. आता आपल्यााला त्या संंपर्काचे डिटेल्स मिळतील. खाली स्क्रोल करा आणि आपणास येथे डिसॲपरिंग मॅसेज दिसेल.
– डिसॲपरिंग मॅसेज इनेबल करायचा आहे. आपण हे इनेबल करताच, संपर्काच्या चॅटमध्ये एक नोटिफिकेशन पाठविले जाईल ज्यामध्ये म्हटले जाईल की आपण डिसॲपरिंग मॅसेज इनेबल केला आहे. यासह, संपर्काच्या नावाखाली टाइमर चिन्ह देखील तयार केले जाईल.
– आता आपण हे वैशिष्ट्य वापरू शकता. 7 दिवस पूर्ण झाल्यावर आपली चॅट आपोआप डिलीट होईल. हे फिचर आपले स्टोरेज देखील वाचवू शकते आणि प्रायव्हसीच्या
बाबतीत हे फिचर चांगले आहे.