नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार देशात गरीबांपर्यंत रेशन पोहचवण्याचे सर्व प्रयत्न करत आहे. यासाठीच सरकारने मागील वर्षी देशात वन नेशन वन कार्डची व्यवस्था सुद्धा लागू केली आहे. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही राज्यातील व्यक्ती संपूर्ण देशात कुठूनही स्वस्त दरात रेशन घेऊ शकतो. या सिस्टममध्ये आल्यानंतर लोकांसाठी रेशन कार्ड असणे आणखी आवश्यक झाले आहे.
जर तुमच्याकडे अजूनपर्यंत रेशन कार्ड नाही तर घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या आपल्या स्मार्टफोनवरूनच ऑनलाईन रेशन कार्डसाठी अप्लाय करून ते बनवू शकता. यासाठी सर्व राज्यांनी आपल्याकडून वेबसाइट बनवल्या आहेत. तुम्ही ज्या राज्यातील राहणारे आहात, तेथील वेबसाईटवर जा आणि रेशन कार्डसाठी अप्लाय करा.
कोन करू शकते अप्लाय
जो व्यक्ती भारताचा नागरिक आहे, तो अप्लाय करू शकतो. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे नाव पालकांच्या रेशनकार्डमध्ये समाविष्ठ केले जाईल. तसेच, 18 वर्षावरील व्यक्ती आपल्यासाठी वेगळ्या रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकते.
असे करा ऑनलाईन अप्लाय
* रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
* जर तुम्ही उत्तर प्रदेशचे राहणारे असाल तर तुम्ही https://fcs&up&gov&in/FoodPortal&aspx वर जाऊन फॉर्म डाऊनलोड करू शकता.
* बिहारचे राहणारे hindiyojana&in/apply-ration-card-bihar/
* आणि महाराष्ट्राचे अर्जदार mahafood&gov&in वर क्लिक करून अर्ज करू शकतात.
* यानंतर Apply online for ration card या लिंक वर क्लिक करा.
* रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येईल.
* रेशन कार्डसाठी अर्जाचे शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करा आणि अॅप्लीकेशन सबमीट करा.
* फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा अर्ज योग्य आढळला तर तुमचे रेशन कार्ड बनवले जाईल.
या कागदपत्रांची आहे आवश्यकता
रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, सरकारद्वारे जारी करण्यात आलेले एखादे आयकार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाऊ शकते. याशिवाय पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचे प्रमाण पत्र, पत्त्याचा पुरावा म्हणून वीजबिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, रेंटल अॅग्रीमेंट यासारखे डॉक्युमेंट सुद्धा लागतील.