नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – रशियात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे दोन पुतळे उभारण्यात येणार असल्याची माहिती विश्वभूषण अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष शेजवळ यांनी दिली आहे. आजच ही घोषणा केल्याचे समजत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त रशियातील पुश्किन विद्यापीठ, मॉस्कोमध्ये दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद सुरु आहे. मुंबई युनिव्हर्सिटी, मॉस्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम. जी. डी ग्रुप ऑफ इंडिया यांच्या सुंयुक्त विद्यमाने साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जन्मशताब्दी सोहळ्यासाठी देशभरातून 350 भारतीय रशियातील पुश्किन विद्यापीठात गेले आहेत. यात नाशिकमधील 30 जणांचा समावेश आहे. प्रशांत साळवे, साहेबराव खरात, उत्तम अहिरे, डॉ. सुरेश कांबळे, शकुंतला खरात, सुभाष पवार, अशोक पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील इतर लोकांचा समावेश आहे. या परिषदेसाठी जाणाऱ्या सर्वांना साठे फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष शेजवळ, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब शिरसाठ आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
नाशिकमधील लेखक डॉ. सुरेश कांबळे यांच्या मातंग समाजातील समस्यांवर आधारीत वेध आणि साठे यांच्या जीवनचिरत्रावर आधारीत सुभाष पवार यांच्या जागर या पुस्तकांचे अनावरण करण्यात येणार आहे.