बहुजननामा ऑनलाईन टीम : भविष्याच्या गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट (FD)हा सर्वोत्तम पर्याय असतो. परंतु देशातील सर्वात मोठी बँक SBIने आपल्या ग्राहकांना चांगलाच धक्का दिला आहे. बँकेने एफडीवरील व्याजदरात मोठी कपात केली आहे. साधारणतः एक ते दोन वर्षे मुदतीच्या एफडीवर ही कपात होणार आहे. त्यामुळे एसबीआय सोबत आता इतर बँकादेखील याचे अनुकरण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसबीआयच्या या निर्णयाचा फटका सर्वांत जास्त जेष्ठ नागरिकांना बसणार आहे.
बँकांनी व्याजदराला रेपो दाराशी जोडावे ना की एमसीएलआरल, रेपो रेटमध्ये सतत बदल होत असतात त्यामुळे रकमेचे व्याजही बदलत असते. त्यामुळे एसबीआयने लागू केलेल्या या निर्णयामुळे ५० लाख रुपयांच्या एफडीवर ५००० रुपयांचे नुकसान होणार आहे, असे आरबीआयने आपल्या आदेशात मांडले होते. मिळालेल्या माहितीनुसार ४.१ कोटी जेष्ठ नागरिकांच्या खात्यावर १४ लाख कोटी रुपये जमा आहेत.
तसेच देशातील अर्थवावस्थेला चालना देण्यासाठी आरबीआय पावले उचलत असल्याने रेपो दर कमी करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांत रेपो दर कमी करण्याची ही ६वी वेळ आहे. त्यामुळे जे व्यक्ती यावर अवलंबून होते त्यांना मोठा फटका बसणार आहे. दरम्यान , एसबीआयने कमी कालावधीच्या आणि कमी रक्कम असलेल्या एफडीवर ०.१० टक्क्यांनी व्याज कमी केले आहे. तर जास्त रकमेच्या एफडीवर ०.३० टक्क्यांनी घट केली आहे. म्हणजे साधारणतः १ लाख रुपये बचत म्हणून ठेवणाऱ्यांच्या व्याजामध्ये ३.५० वरून ३.२५ एवढी कपात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Visit : bahujannama.com