पुणे : बहुजननामा ऑनलाइन – ST Workers Strike | गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. राज्यातील अनेक भागात एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) चिघळला आहे. प्रलंबित मागण्या पुर्ण होण्यासाठी पुणे विभागातील एसटी (Pune Division ST Depot) कामगारांनी (रविवारी) 7 नोव्हेबर रोजी मध्यरात्रीपासून पुणे विभागातील एसटी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभुमीवर रविवारी रात्री 12 नंतर पुणे विभागातील जवळपास 13 डेपो बंद झाले आहेत.
एकीकडे एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील डेपो बंद झालेत. या संपाबाबत माहिती नसल्याने अनेक प्रवासी स्वारगेट एसटी स्थानकात (Swargate Bus Station) येऊन परतत आहेत. स्वारगेट स्थानकात बाहेरून येणाऱ्या आणि स्वारगेट स्थानकातून बाहेर जाणाऱ्या सर्वच्या सर्व गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची तारांबळ होत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, स्वारगेट एसटी स्थानकातील आणि डेपोतील सर्व एसटी कामगार संपास उतरले आहेत. त्याचबरोबर कामगारांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. तर, एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) असल्याने त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
web title: st workers strike due to st workers strike 13 depots in pune division closed passenger cable .
Pune Crime | बोनसमधील रक्कम पार्टीसाठी देण्यास नकार; येरवड्यात तरूणावर सपासप वार करून खुनाचा प्रयत्न
Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ