मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वर्धा रोडवरील सेंट व्हिन्सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिकांना लेगिंग्ज, पॅन्ट ऐवजी प्रशासनाने सलवार-कुर्ती घालण्याचे बंधन घेतले आहे. हे बंधन घालण्यात आल्यामुळे प्राध्यपिकांकडून तीव्र विरोध होत आहे. हा निर्णय म्हणजे महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरील गदा असून प्रशासनाने ही गळचेपी थांबवावी, अशी मागणी होत आहे.
सेंट व्हिन्सेंट पलोटी अभियांत्रिकीची नागपुरात २००४ मध्ये सुरुवात झाली. विशेष म्हणजे, संस्थेत नोकरी करायची असल्याने प्राध्यापिका पुढे येऊन निषेध करीत नसल्या तरी नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे. २००४ वेळी तिथे शिक्षकवर्गासाठी कुठल्याही प्रकारचा ‘ड्रेसकोड’ नव्हता. व तसेच शहरातील इतरही अभियांत्रिकी महाविद्यालयातील कुठल्याही शिक्षिकांना ‘ड्रेसकोड’ नाही. त्यांना पाहिजे तो पोशाख त्या प्राध्यापिका परिधान करू शकता. परंतु, सेंट पलोटी महाविद्यालय प्रशासनाने लेगिंग्ज व पॅन्ट ऐवजी सलवार-कुर्ती घालायचे सांगितले आहे.
व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि उपप्राचार्य यांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला. महाविद्यालयाच्या कार्यकारिणी पदावर आणि तक्रार समितीमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वाचा अभाव असल्यामुळे तंत्रशिक्षण अधिकारी आणि राष्ट्रीय महिला आयोग यांना हा निर्णय देण्यास महाविद्यालयाने भाग पाडल्याचा दावाही प्राध्यापिकांकडून केला जात आहे. काही प्राध्यापिकांनी त्यांच्या गणवेशाशी मिळताजुळता दुसरा पोशाख घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाला ही बाब योग्य न वाटल्याने त्यांना सलवार घालण्याचे तोंडी आदेश दिले. प्रशासनाने यावर पुनर्विचार करावा, अशी मागणी आता पुढे येत आहे.
काही प्राध्यापिकांच्या म्हणण्यानुसार, जुलै २०१८ मध्ये एका प्राध्यापिकेने वरिष्ठ प्राध्यापकाला याबाबत लेखी आदेश देण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्या प्राध्यापिकेला सर्वासमोर अपमानित करण्यात आले. आम्ही त्या प्राध्यापिकेला रडताना पाहिले. मात्र, कोणीही भीतीमुळे काहीही करू शकले नाही. सलवारसूट घातलेल्या भौतिकशास्त्रातील एका प्राध्यापिकेला एका प्राध्यापकाने ओढणी नीट करायला लावली. यामुळे त्या प्राध्यापिकेने राजीनामा दिला. व्यवस्थापन फक्त शरीराला पाहते का, असा खडा सवाल या प्राध्यापिकांनी उपस्थित केला.