बहुजननामा ऑनलाईन – नागपूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार. एका १८ वर्षांच्या विद्यार्थिनीला जबरदस्ती बिअर पाजून तिच्यावर बलात्कार झाल्याची बाब समोर आली आहे. ही घटना बेल तरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी २ आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. निखिल सोमकुवर आणि वतन गोमकाले अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस चौकशीत समोर आलेली बाब म्हणजे दोन्ही आरोपी हे पीडितेच्या मामाचे मित्र आहेत. पीडितेला आईनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता पीडितेने याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडित मुलगी ही बी. कॉम प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. या प्रकरणात निखिल सोमकुवर हा मुख्य सूत्रधार आहे. हा पीडितेच्या मामाचा मित्र आहे. काही दिसवांपूर्वीच निखिल नागपुरात आला होता, याआधी तो मुंबई येथे काम करत होता. नागपूरमध्ये निखिल एका खाजगी कंपनीत मॅनेजर होता. निखिलने तीन महिन्यांपूर्वी पीडितेसोबत फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. आरोपी निखिल १७ जुलै रोजी पीडितेच्या घरी आला होता. तेव्हा पीडितेची आई कामाला गेली होती तर भाऊ शाळेत गेला होता. याच दिवशी निखिलने पीडितेचा हात पकडून तिला बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित मुलगी घाबरली असल्याने या बाबत कुठेही वाच्यता केली नाही. यामुळे आरोपी निखिलला अधिक बळ मिळाले.
पीडितेच्या जबाबानुसार १९ जुलैला दुपारी दीड वाजता पुन्हा निखिल पीडितेच्या घरी आला. त्याच्या सोबत त्याचा मित्र गोमकाले ही होता. त्यांनी सोबत बिअरची बाटलीही आणली होती. पीडितेला दोघांनीही जबरदस्ती बियर पाजली आणि त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. एवढेच नाही तर याबाबत कुठेही सांगितल्यास पीडितेच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. आणि दोघे फरार झाले. आई जेव्हा घरी आली तेव्हा तिला मुलीच्या वर्तवणुकीवर शंका आली. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा पीडितेने घडलेली घटना सांगितली. याबाबत ३१ जुलै रोजी बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींना अटक केले.