नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SSY | पंजबा नॅशनल बँक (Punjab National Bank) मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana- SSY) आणली आहे. या योजनेद्वारे मुलींचे भविष्य सुरक्षित करता येऊ शकते. योजनते आई-वडिल किंवा गार्डियन मुलीच्या नावावर केवळ एक अकाऊंट उघडू शकतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
किती करावे लागते डिपॉझिट
यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता. हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते.
मॅच्युरिटीनंतर मिळतील 15 लाखापेक्षा जास्त
जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिना 3000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे वार्षिक 36000 रुपये लावले तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्ष म्हणजे मेच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल. सध्या या योजनेत 7.6 टक्केपेक्षा जास्त व्याज दिले होते ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे.
कुठे उघडू शकता खाते
जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली गुंतवणूक पॉलिसी (Investment Policy) घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी SSY शानदार योजना आहे.
तुम्ही पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) योजनेंतर्गत अकाऊंट उघडू शकता.
द्यावी लागतील ही कागदपत्रे
मुलीचा जन्मदाखला, आई-वडीलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाणी बिल) जमा करावे लागेल.
Web Title :- ssy you can open account pnb from 250 rupees and get rs 15 lakh benefits check how
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update