मुंबई : वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सुरू आहे त्यामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यातच ड्रग अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो याबाबत अधिक चौकशी करत आहे. एनसीबीने यासंदर्भात आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती सध्या तिच्या वादग्रस्त बोलण्यामुळे अधिक अडकत चालली आहे. नुकतेच तिचे आणि तिच्या भावाचे काही चॅट समोर आले, त्यामध्ये या दोघांमध्ये ड्रग संबंधी बोलणं झाल्याचं समोर आलं आहे.
सुशांत प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत त्यामुळे हे प्रकरण रोज नव्या वळणावर येत आहे. रियाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की सुशांत रोज गांजा घेत होता, पण त्याचं ड्रगशी काही घेणंदेणं नव्हतं. नुकतेच रिया आणि तिच्या भावाचे काही चॅट समोर आले त्यात ती तिच्या भावाकडून ड्रग मागत आहे. इंडिया टूडेच्या अहवालानुसार, रिया तिच्या भावाला कोणासाठी तरी ‘बडस’ खरेदी करण्यास सांगत आहे.
लिक झालेली चॅट 15 मार्च 2020 या तारखेची आहे. रिया तिच्या भावाला मेसेज मध्ये लिहिते की, तो दिवसातून चार ओढतो, त्यामुळे त्याहिशोबानेच प्लान कर. रिप्लाय देत शोविक लिहितो की, त्याला बड पाहिजे का. अशा प्रकारची रिया आणि तिच्या भावाची चॅट समोर आली आहे.
त्यानंतर रिया लिहिते की, हो BUD पण पाहिजे. रियाच्या या मेसेज नंतर शोविक म्हणतो, हे विदेशातून मुंबईत आणलं जातं आणि हे कोकिनपेक्षा महाग मिळतं.
रिया आणि शोविकची ही चॅटमुळे दोघांच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणात एनसीबीने आत्तापर्यंत दोन ड्रग पेडलर्सना अटक केली असून अटक करण्यात आलेल्या दोघांनी रियाचा भाऊ शोविकच्या नावाचा खुलासा केला आहे. एनसीबीला अशीही माहिती मिळाली आहे की शोविक अनेक ड्रग पेडलरच्या संपर्कात होता.