मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – SSC Result 2021 । कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra government) दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला 10 वीच्या परीक्षेचा (MH board 10th result date) निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येणार आहे. अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. SSC Result 2021 | maharashtra ssc board will release 10th class result on 16th july one pm at mahresult nic in
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोरोनामुळे 10 वीतील विद्यार्थ्यांचे (Maharashtra state SSC Board) निकाल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने रोखून ठेवले होते. म्हणून राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांमधून निकाल कधी लागणार? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. मात्र, आता याचे स्पष्टीकरण समोर आले आहे. आज शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी आज ट्विट करीत 10 वीचा निकाल उद्याच होणार असल्याचे जाहीर केले आहे.
EPFO | खुशखबर ! PF खातेधारक आता घरबसल्या अपडेट करू शकतात बँक डिटेल, जाणून घ्या काय आहे प्रोसेस ?
असा पहा निकाल –
> अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या. maharashtraeducation.com
> मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र 10 वीच्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा.
> आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
> आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा.
> आपला SSC निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.
> संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा.
Web Title : SSC Result 2021 | maharashtra ssc board will release 10th class result on 16th july one pm at mahresult nic in
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update