बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिचा पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुण येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार(Baby Bump) आहेत. लवकरच तैमूर अली खानला (Taimur Ali Khan) भावंड मिळणार आहे. सध्या करीना तिचा प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे. या काळात ती सोशलवर अॅक्टीव्ह दिसत आहे. 2021 मध्ये ती आई होणार आहे. सध्या आपल्या फोटोमुळं करीना चर्चेत आली आहे.
करीनानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात सेल्फीमध्ये करीना तिचं बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. तिचे हावभाव देखील पाहण्या सारखे आहेत. यावेळी करीना नो मेकअप लुकमध्ये दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं स्पोर्ट ब्रा घातली आहे.
करीनाचा हा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी लाईक्स आणि कमेंट करायला सुरुवात केली. काहींना करीनाचा हा लुक खूप आवडला आहे. सध्या तिचा हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.
करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता. लवकरच ती करण जोहरच्या तख्त या मल्टीस्टारर सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमिर खानसोबत काम करणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज होणार आहे.