बहुजननामा ऑनलाइन टीम – सोलापूर : पंढरपूर – सांगोला रोडवर थांबलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील चार जणांचा जागीच मृत्यु झाला.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील ७ वा मैल परिसरात शुक्रवारी ६ वाजता हा अपघात झाला आहे.
याबाबत मिळालेल्या महितीनुसार, गुजरातवरुन एक ट्रक येत होता. तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोदाळी येथील बोलेरो कारमधून धोंडीराम धनगर व इतर पाठीमागून येत होते. कासेगाव येथे रस्त्याच्या कडेला हा ट्रक थांबला होता. कारचालकाला पुढे थांबलेला ट्रक दिसला नाही. त्याने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात बोलेरो कारचा चेंदामेंदा झाला. कारमधील धोडीराम धनगर तसेच २ महिला आणि एक लहान मुलगी यांचा जागीच मृत्यु झाला. एक जण जखमी असून त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.