पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Karmala Accident News | शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कार आणि कंटेनरची धडक झाली ज्यात चार जणांचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले. सुदैवाने यात आठ महिन्यांची मुलगी बचावली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास सोलापुर जिल्ह्यातील करमाळा (Solapur Karmala Accident News) तालुक्यात पांडे गावाजवळ घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घटनेत श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्योती दीपक हुनशामठ (३८ रा. कलबुर्गी) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) या चार जणांचा मृत्यू झाला. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशैल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) आणि तवेरा चालक श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) जखमी झाले आहेत. (Solapur Karmala Accident News)
कर्नाटकातील कलबुर्गी, हुबळी, बागलकोट भागातील एकमेकांचे नातेवाईक असलेले भाविक देवदर्शनासाठी तवेरा गाडीतून निघाले होते. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर हे भाविक तुळजापुरात मुक्काम करून बार्शी-परांडा-करमाळामार्गे (Via Barshi-Paranda-Karmala) पुढे शिर्डीकडे जाण्यासाठी निघाले होते. करमाळा तालुक्यातील पांडे गावच्या हद्दीत तवेरा व कंटेनर यांची जोरात धडक झाली. अपघातानंतर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली पालथी होऊन अक्षरशः चक्काचूर झाली. अपघातानंतर कंटेनर चालकाने पलायन केले. अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस (Karmala Police) घटनास्थळी दाखल झाले. जखमींना करमाळ्यातील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- पुण्यातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कोंढवा, अलंकार पोलिस स्टेशन आणि वाहतूक शाखेत नियुक्त्या
- बिल्डरच्या खोट्या सह्या करुन बनवले बनावट दस्तऐवज, फ्लॅटधारकाची 38 लाखांची फसवणूक; सेल्स मॅनेजरवर FIR
- दुचाकीची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; वाघोली परिसरातील घटना
- व्यवसाय सुरु करुन देण्याच्या बहाण्याने 30 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार
- अल्पवयीन मुलीला घरात नेऊन अश्लील चाळे, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; पुण्यातील प्रकार