बहुजननामा ऑनलाईन टीम : सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या कांचना यन्नम यांची महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी एमआयएमच्या शाहजादीबानो शेख यांचा ५१ विरुद्ध ८ मतांनी पराभव केला आहे. महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांचा महाविकास आघाडी गठीत करुन सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न फसला आहे.
सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असून भाजपाने महापौरपद राखले आहे. भाजपाच्या कांचना यन्नम यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांना एकूण ५१ मत मिळाले आहे. नूतन महापौर श्रीकांचना यन्नम या विनकर समाजाच्या आठव्या आणि पहिल्याच महिला महापौर ठरल्या आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दावा केला होता की, त्या सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीत महापौर विराजमान होईल मात्र, भाजपाने बाजी मारल्याने आघाडीचा प्रयोग फसल्याचे चित्र दिसत आहे.
महापौर निवडीच्यावेळी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, बसपा इत्यादी पक्षांचे नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे भाजपाला महापौर निवडून आणणे सहज सोपे झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेचे राजकुमार हंचाटे व बसपाच्या स्वाती आवळे यांनीही भाजपाला मतदान केले होते. निवडणुकीच्या आधी भाजपविरुद्ध व्यवरचना करणाऱ्या शिवसेनेला संख्याबळ जमवण्यात अपयश आले. एवढेच नव्हे तर महापौरपदाच्या निवडणुकीत बसपा आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने मत भाजपाला दिले आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असणाऱ्या शिवसेनाचीच अडचण झाली.
Visit : bahujannama.com