सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – Solapur Crime News | सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. डोक्यात दगड घालून या तीन महिलांची हत्या झाल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. (Solapur Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे नेमके प्रकरण?
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. दिपाली माळी (वय 21), पारूबाई माळी (वय 60), संगीता माळी (वय 55) अशी हत्या करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. या तिन्ही महिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
नंदेश्वर गावाच्या पोलीस पाटलांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलीस निरीक्षक रणजित माने तातडीने आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. हि हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे अद्याप समजू शकलेले नाही. मंगळवेढा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Title :- Solapur Crime News | three women murdered in solapur mangalwedha nandeshwar village police investigation
हे देखील वाचा :